शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

50 वर्षांपासून बंद असलेले घर उघडताच फुटला घाम, समोर आले घरातील फोटोज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 5:38 PM

1 / 10
सोशल मीडियावर अर्बन एक्सप्लोरर एडम मार्कचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. तो नेहमी ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरेशनचे व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करत असतो.
2 / 10
यूकेचा रहिवासी असलेला अर्बन एक्सप्लोरर एडम मार्क जगभर फिरुन अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घरांचे व्हिडिओ बनवत असतो.
3 / 10
काही दिवसांपूर्वी एडमला स्कॉटलँडमधील 50 वर्षांपासून बंद असलेल्या एका बंद घराचा व्हिडिओ बनवण्याची संध मिळाली.
4 / 10
मागील पाच दशकांपासून बंद असलेल्या घराचा व्हिडिओ बनवत असताना घरातील दृष्य पाहून एडमला घाम फुटला.
5 / 10
एडम मार्कला त्या घरात 1970 चे काही डॉक्युमेंट्स आणि विचित्र गोष्टी दिसल्या. ते घर पाहूनच 70 च्या दशकातील असल्याचे कळत होते.
6 / 10
एडमला त्या घरातील किचनमध्ये एका मांजरीची बॉडी मिळाली, ती बॉडी पाहून एडम जोरात किंचाळला.
7 / 10
50 वर्षांपासून बंद असल्यामुळे घराची खूप पडजड झाली होती. पण, एडमला त्या घराच्या डायनिंग एरियाने चकीत केले.
8 / 10
डायनिंग डेबलवर मांडलेल्या प्लेट्स पासून, घरातील लोक आताच जेवायला बसणार आहेत, असे वाटत होते.
9 / 10
एडमला या बंद घरामध्ये अॅनाबेल चित्रपटातील बाहुलीप्रमाणे एक भीतीदायक बाहुलीही दिसली, तिला पाहून एडमला चांगलाच घाम फुटला.
10 / 10
एडम मार्कचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, पण इतके चांगले घर का बंद पडले आहे आणि त्या घरातील लोकांच काय झालं, असा प्रश्न अनेकांना पडलाय.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरल