खूशखबर! जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 03:14 PM2020-09-24T15:14:19+5:302020-09-24T15:18:44+5:30

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. जगात असे अनेक धोकादायक व्हायरस आहेत. आतापर्यंत लोकांना व्हायरस कसा संपुष्टात येईल याची भीती वाटत होती, कारण त्याला कोणताही जीव खात नाही. परंतु वैज्ञानिकांना समुद्रात असा एक सूक्ष्म जीव सापडला आहे जो अनेक प्रकारचे व्हायरस खातो. जगातील असा पहिला जीव आहे जो पूर्णपणे व्हायरस खातो. शास्त्रज्ञांनी पडताळणी केल्यानंतर याची पुष्टी केली आहे.

हा सूक्ष्मजीव स्पेनमधील कॅटालोनियाजवळील मॅनीच्या खाडीत आणि भूमध्य सागरात सापडला आहे. त्याला सायंटिस्ट प्रोटीस्ट असं म्हटलं जात आहे. जेव्हा प्रोटिस्टचा अभ्यास केला गेला तेव्हा दोन प्रकारचे गट समोर आले. यास चोआनोझन्स आणि पिकोझोन्स म्हणतात. कारण त्यांच्या डीएनएमध्ये थोडासा फरक आहे.

मॅन शहरात राहणाऱ्या आणि प्रोटिस्टचा शोध लावणाऱ्या बिग्लो लॅबोरेटरी फॉर ओशन सायन्सेसच्या संशोधक ज्युलिया ब्राउन म्हणतात की, जगातील कोणत्याही प्राण्याचे डीएनए प्रोटिस्टमध्ये जुळत नाहीत. ज्या व्हायरसमुळे मनुष्य, प्राणी, पक्षी आणि वनस्पती त्रस्त असतात आणि त्यामुळे मरतात. त्यांना खाणारा जीव सापडला आहे.

ज्युलिया ब्राउन म्हणाल्या की पहिल्यांदा प्रोटिस्टवर व्हायरसचं सक्रमण झाल्याचं वाटलं. परंतु जेव्हा आम्ही बारकारईने अभ्यास केला तेव्हा असं दिसून आलं की या सूक्ष्मजीवाने व्हायरसला संपवलं आहे. त्याने तो व्हायरस खाल्ला होता. त्यानंतर आम्ही हा अहवाल तयार केला, जो मायक्रोबायोलॉजीमध्ये फ्रंटियर्स नावाच्या मासिकात प्रकाशित झाला.

व्हिएन्ना युनिव्हर्सिटीच्या मायक्रोबियल इकोलॉजिस्ट क्रिश्चियन ग्रेबलर यांनी सांगितले की, विषाणू एका सूक्ष्मजंतूच्या पोटात कसा गेला यावर ते सहमत नाही. कारण व्हायरस हल्ला करतो त्याला खाणे कठीण आहे. यावर आणखी अभ्यासाची गरज आहे. जर हा सूक्ष्मजीव खरोखर व्हायरस खात असेल तर ही आनंदाची बाब आहे.

अन्न साखळीतील नवीन अध्याय अभ्यासामुळे शास्त्रज्ञांना आनंद झाला. प्रोटिस्ट्स न्यूक्लियसमध्ये डीएनए असतो, ज्यास युकेरियोट्स म्हणतात. युकेरियोट्समध्ये विषाणूचे काही भाग सापडले आहेत. यामुळे प्रोटिस्ट्स व्हायरस खात असावा हे ख्रिश्चन ग्रेबलर यांनी मान्य केलं आहे.

ज्युलिया ब्राउनने मॅन देशातील १७०० प्रोटिस्ट्सचा अभ्यास केला. या १७०० प्रोटिस्ट्समध्ये १० वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्यांच्या डीएनएची चाचणी घेण्यात आली. त्यात मॅन खाडीतून बाहेर आलेल्या ५१ टक्के प्रोस्टिस्टमध्ये आणि भूमध्य सागरी भागातून बाहेर पडलेल्या सूक्ष्मजीवांपैकी ३५ टक्के प्रोटिस्ट्स बॅक्टेरियोफेजच्या रुपातील व्हायरस खातात.

जेव्हा वैज्ञानिकांनी चोआनोझन्स आणि पिकोझोआनची संपूर्ण तपासणी केली तेव्हा असं आढळलं की त्यांच्या नमुन्यांपैकी १०० टक्के व्हायरसचे डीएनए अनुक्रम मिळाले आहेत, त्यामुळे प्रोटिस्टस कोणत्याही प्रकारचे व्हायरस खाऊ शकतात असं तथ्य मिळालं आहे.

ख्रिश्चन ग्रेबलर म्हणाले की चोआनोझन्सच्या व्हायरस खाण्याची आधीच पुष्टी झाली आहे. पण पिकोझोन्सचे खाणे-पिणे एक रहस्यच राहिले. ज्युलिया आणि तिच्या टीमच्या अभ्यासावरून आम्हाला या फूड चेनला आधार मिळाला आहे. त्याचा अभ्यास करणं महत्वाचे आहे.

भविष्यात व्हायरसमुळे होणारे रोग या सुक्ष्मजीवांमुळे बरे करण्यास मदत मिळेल. कारण हे सूक्ष्मजीव संपूर्ण पृथ्वीवर आहेत. त्यांची संख्या कधीच संपत नाही. ते पृथ्वीच्या संपूर्ण बायोमासपैकी ५० टक्के आहेत. म्हणूनच, जर आपण सखोल अभ्यास केला तर या सूक्ष्मजीवांमधून आपल्याला अशी औषधे मिळू शकतात जी आपल्याला बर्‍याच रोगांपासून संरक्षण देतील असं ख्रिश्चन ग्रेबलर म्हणाले.