पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय कुतुब मीनारपेक्षाही 4 पटीने मोठा उल्कापिंड, केवळ दोन दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:47 PM2020-06-22T12:47:30+5:302020-06-22T13:13:26+5:30

हा लघुग्रह 46, 400 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा लघुग्रह 24 जूनला दुपारी 12.15 वाजता पृथ्वीच्या जवळून जाईल.

नासाचे वैज्ञानिक अशा सर्वात लघुग्रहांना धोका मानतात जे पृथ्वीपासून 75 लाख किमोमीटरच्या अंतराहून जातात. या वेगाने जाणाऱ्या खगोलीय उल्कापिंडाना नीअर अर्थ ऑबजेक्टस असे म्हटले जाते.

या लघुग्रहाचं नाव आहे 2010एनवाय65. हा लघुग्रह 1017 फूट लांब आहे म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा साधारण तीन पटीने आणि कुतूब मीनारपेक्षा चार पटीने मोठा आहे.

हा लघुग्रह 46, 400 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा लघुग्रह 24 जूनला दुपारी 12.15 वाजता पृथ्वीच्या जवळून जाईल. (प्रातिनिधीक छायाचित्र)

अमेरिकेतील एजन्सी नासाचा अंदाज आहे की, हा लघुग्रह पृथ्वीपासून साधरण 37 लाख किलोमीटर दूरून जाईल.

नासाचे वैज्ञानिक अशा सर्वात लघुग्रहांना धोका मानतात जे पृथ्वीपासून 75 लाख किमोमीटरच्या अंतराहून जातात. या वेगाने जाणाऱ्या खगोलीय उल्कापिंडाना नीअर अर्थ ऑबजेक्टस असे म्हटले जाते.

सूर्याच्या चारही बाजूने फिरणारे हे छोटे छोटे लघुग्रह अनेकदा पृथ्वी जवळून जातात. अनेकदा या ग्रहांमुळे पृथ्वीचं नुकसानही होतं.

जूनमध्ये लघुग्रह पृथ्वी जवळून जाण्याची ही तीसरी घटना आहे. याआधी 6 जून रोजी एक लघुग्रह पृथ्वी जवळून गेला होता. हा लघुग्रह 570 मीटर व्यासाचा होता. हा लघुग्रह पृथ्वीपासून 40, 140 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गेला होता. याचं नाव 2002एनएन4 होतं.

त्यानंतर 8 जून रोज एक लघुग्रह 2013एक्स22 पृथ्वी जवळून गेला होता. याची वेग 24,050 किलोमीटर प्रति तास इतका होता. हा पृथ्वीपासून साधारण 30 लाख किलोमीटर दुरून गेला होता.

दरम्यान, 2013 मध्ये चेल्याबिंस्क लघुग्रह रशियात पडला होता. यामुळे 1 हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हजारो घरांच्या खिडक्या आणि दरवाजे तुटले होते.