अमेरिकेच्या टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार, 27 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 11:10 IST2017-11-06T11:07:12+5:302017-11-06T11:10:44+5:30

अमेरिकेतील टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये एका व्यक्तीनं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत हल्लेखोरही ठार झाला असून त्याला पोलिसांनी मारलं की त्याने स्वत:च गोळी झाडून घेतली याबाबत नेमकी माहिती हाती आलेली नाही.
रविवारी सकाळी 11:30 वाजता गोळीबार झाल्याची माहिती आहे. सकाळी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी लोक जमले असताना ही घटना घडली.
हल्लेखोराचे नाव डेविन केले (26) असे सांगण्यात येत आहे. टेक्सासमधील न्यू ब्रॉनफेल्स भागातील तो रहिवाशी आहे.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. घटनेबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.