Maglev Train: विमानापेक्षाही वेगवान, अवघ्या २ तासांत १२०० किमी अंतर कापणार 'ही' सुपरफास्ट ट्रेन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:35 IST2025-07-15T10:31:28+5:302025-07-15T10:35:02+5:30
China Maglev Train जगातील सर्वात वेगवान ट्रेनची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली.

भारतात बुलेट ट्रेनची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात आहे. जगातील अनेक देशही या प्रकल्पावर काम करत आहेत. अशातच चीनने संपूर्ण जगाला आश्चर्यचकीत केले आहे. चीनने बुलेट ट्रेनपेक्षाही वेगवान ट्रेन तयार केली आहे.
या ट्रेनला मॅग्लेव्ह ट्रेन असे म्हटले जात आहे, ज्याचा कमाल वेग ताशी ६०० किमी पर्यंत असू शकतो. म्हणजेच ही ट्रेन बुलेट ट्रेनपेक्षा दुप्पट वेगान धावेल, असा दावा करण्यात आला.
चीनने बनवलेली ही ट्रेन मॅग्लेव्ह तंत्रज्ञानावर चालते. ट्रेन धावत असताना तिचा ट्रॅकशी कोणताही संपर्क होत नाही. या तंत्रज्ञानामुळे कोणतेही घर्षण होत नाही आणि प्रवास अगदी सुरळीतपणे पूर्ण होतो.
या ट्रेनची चाचणी एका खास व्हॅक्यूम बोगद्यात करण्यात आली आहे जिथे हवेचा दाब नाही. हवेचा दाब नसल्याने ट्रेन त्याच्या कमाल वेगाने धावली. हवेच्या दाबामुळे ट्रेन इतक्या वेगाने धावू शकत नाही.
मॅग्लेव्ह ट्रेन अनेक देशांमध्ये धावत आहेत पण त्यांचा वेग ताशी फक्त ४३० ते ६०० किलोमीटर आहे. या ट्रेनच्या यशस्वी चाचणीनंतर चीनने या क्षेत्रात जपान, अमेरिका आणि युरोपसारख्या देशांच्या पुढे पाऊल टाकले आहे.
चीनची मॅग्लेव्ह ट्रेन बीजिंग ते शांघाय दरम्यानचे १२०० किमीचे अंतर अवघ्या दोन तासांत ६०० किमी प्रतितास वेगाने पूर्ण करेल. जर ही ट्रेन भारतात धावली तर दिल्ली ते मुंबई हे अंतरही फक्त दोन तासांत गाठता येईल.