'या' देशात ८०० वर्ष जुन्या ज्वालामुखीचा उद्रेक, फोटोंमधील हाहाकार पाहुन होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:15 PM2021-12-08T18:15:54+5:302021-12-08T19:44:50+5:30

Fagradalsfjall Volcano: सध्या ज्वालामुखीच्या जबरदस्त उद्रेकामुळं Iceland मधून काही धक्कादायक फोटो समोर येत आहे. पाहा काळीज पिळवटून टाकणारे Photos

Fagradalsfjall Volcano या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे फोटो फोटोग्राफर होरुर क्रिस्टलीफसन यांनी ड्रोनच्या मदतीने घेतले आहे. त्यात ज्वालामुखीचे मोठमोठे लोट दिसत आहे.

आइसलँडची राजधानी रेकजाविकपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट फॅग्राडॉसफियाकवर हे फोटोज काढण्यात आलेले आहेत. त्यात तप्त लाव्हारस स्पष्टपणे दिसत आहे.

आइसलँडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर होरुर क्रिस्टलीफसन हे क्रेटरवर ड्रोन उडवत होते. त्यावेळी क्रेटरचा काही भाग खाली ढासळला.

फोटोत दिसणारा क्रेटर जरी छोटा दिसत असला तरी याची उंची ही 5 मजली इमारतीएवढी आहे.

फाग्रादाउसफियाक च्या पर्वतावरचा हा ज्वालामुखी 800 वर्षांपासून फुटलेला नव्हता.

काही दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपामुळं हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला असल्याचं बोललं जात आहे.

समोर आलेल्या फोटोंमधून हा विस्फोट छोटा वाटतो. परंतु या ज्वालामुखीतून निघलेला लाव्हा हा ३२ किलोमीटरपर्यंत पसरला होता.

त्याच्या उद्रेकामुळं १ हजार ६४० फुट उंचीच्या लाव्हारसाची एक आकृती तयार झाली होती.

त्याचबरोबर चार दिवसांमध्ये १ कोटी वर्ग फुट लाव्हा बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.

Iceland या देशातील या ज्वालामुखीचे हे फोटो पाहुन लोकांना जबरदस्त धक्का बसत आहे.