बर्फाच्या घरात राहणं फारच जिकिरीचं, असा रोमांच नक्कीच अनुभवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 21:07 IST2017-10-12T20:57:00+5:302017-10-12T21:07:45+5:30

ऑस्ट्रियातल्या हॉचब्रिक्सेनमध्ये अल्पेंइग्लू गाव आहे. या गावात एक बर्फामध्येच एक रेस्टॉरंट आहे.
या रेस्टॉरंटमध्ये शरीरातली गरमी अबाधित ठेवण्यारी पेयही फुकटात दिली जातात. या झोपडीसारख्या घरांना इग्लू या नावानं ओळखलं जातं.
फिनलँडमध्येही इग्लूचा व्यवसाय फायद्यात आहे. रात्रीच्या अंधारात हे इग्लू अशा प्रकारे चमकतात.
फिनलँडमधील काक्लॉटाटॅनन येथील आर्कटिक रिसॉर्ट आहे. काक्लॉटाटॅनन येथील आर्कटिक रिसॉर्टमध्ये प्रत्येक इग्लूमध्ये 2 बेड, एक टॉयलटसह शॉवरही उपलब्ध करून दिलं आहे.
ब-याचदा पर्यटक नव्या वर्षाचं सेलिब्रेशन किंवा ख्रिसमसच्या सुट्ट्या घालवण्यासाठी इथे येतात. स्वित्झर्लंडमधल्या इल्गू डॉर्फही पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे.