शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या गावातील प्रत्येक व्यक्ती आहे कुंग फू मास्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 8:55 PM

1 / 5
कोणत्याची संकट काळात आत्मसंरक्षण करण्याची गरज असते. कुंग फू या प्राचीन कलेच्या माध्यमातून एकमेकांचं संरक्षणही करता येतं.
2 / 5
मध्य चीनच्या तियानझु प्रांतातील गॅक्सीडाँग या गावाची प्रसिद्धी मार्शल आर्टसाठी जगभरात आहे. या गावाने कुंग फूची परंपरा आजही जपून ठेवली आहे.
3 / 5
शेतकरी असोत अथवा व्यावसायिक, उद्योजक असोत सर्व लोक येथे नियमाने कुंग फूचा सराव करताना दिसतात.
4 / 5
150 वर्षांपूर्वी येथे तन्ग्लाओशून नावाचा एक भिक्षू आला होता. त्याने राजाच्या सेनेपासून बचाव होण्यासाठी येथील शाओलीन मंदिरात आश्रय घेतला होता.
5 / 5
सुरुवातीला गावातील लोकांनी त्याला त्रास दिला, मात्र त्याला अवगत असलेल्या मार्शल आर्ट कलेने त्याने सर्वांचा पराभव केलाच पण त्याचा इतका प्रभाव गावातील लोकांवर पडला की त्यांनीही कुंग फू आत्मसात केले.