By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:09 IST
1 / 10अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इराणमध्ये एका अत्यंत धोकादायक लष्करी कारवाईचा विचार करत आहे. इराणची सर्वात मौल्यवान संपत्ती ४५३.५ किलोग्रॅम संवर्धित युरेनियम जप्त करण्यासाठी अमेरिकी सैन्य इराणमध्ये पाठवण्याचा डोनाल्ड ट्रम्प विचार करत आहेत. 2 / 10याच युरेनियमसाठी इराण इतके मोठे युद्ध लढत आहे. ज्यासाठी त्याने आपल्या सर्वोच्च नेत्यांचे आणि लष्करी कमांडरांचे बलिदान दिले आहे. अमेरिकेला हे साडेचार क्विंटल युरेनियम मिळवायचे आहे. त्यामुळे अमेरिका इराणवर तगडा प्रहार करण्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, जर या प्रस्तावित मोहिमेला मंजुरी मिळाली तर अमेरिकी सैन्य अनेक दिवस किंवा शक्यतो त्याहूनही अधिक काळ इराणच्या भूमीवर तैनात राहील. या कृतीमुळे सध्या सुरू असलेल्या संघर्षात लक्षणीय वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. 3 / 10अद्याप या मोहिमेबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु डोनाल्ड ट्रम्प या पर्यायासाठी तयार आहेत कारण तो त्यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. इराणने कधीही अण्वस्त्रे विकसित करू नयेत अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. परंतु या मोहिमेत सहभागी होणाऱ्या अमेरिकी सैनिकांच्या सुरक्षेबद्दलही ट्रम्प यांना चिंता आहे. इरामध्ये ४५३.५ किलो ६०% संवर्धित बॉम्बचा वापर अंदाजे १०-११ बॉम्ब बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. हा एक सैद्धांतिक अंदाज आहे आणि प्रत्यक्ष स्फोटक क्षमता किंचित जास्त किंवा कमी असू शकते.4 / 10डोनाल्ड ट्रम्प यांनी राजनैतिक पर्यायावरही भर दिला आहे आणि युद्ध संपवण्यासाठीच्या मोठ्या कराराचा भाग म्हणून इराणवर दबाव आणून ते साहित्य सोपवण्यास आपल्या सल्लागारांना सांगितले आहे. त्यांनी खासगी संभाषणांमध्ये इराणे ते साहित्य स्वतःकडे ठेवू शकत नाहीत असं स्पष्ट केले आणि जर वाटाघाटी अयशस्वी झाल्या, तर युरेनियम जबरदस्तीने मिळवण्याच्या शक्यतेचाही विचार केला जाऊ शकतो.5 / 10रविवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक कठोर अल्टिमेटम दिला. इराणने अमेरिकेच्या मागण्यांचे पालन केलेच पाहिजे अन्यथा त्यांच्याकडे कोणताही देश उरणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं. युरेनियमचा संदर्भ देत त्यांनी इराण न्यूक्लियर डस्ट आम्हाला सोपवेल असं सांगितले. 6 / 10इराणची सर्वात गुप्त वस्तू कुठे ठेवली आहे? - गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांपूर्वी इराणकडे ६० टक्क्यांपर्यंतचे ४०० किलोग्रॅमपेक्षा जास्त उच्च संवर्धित युरेनियम आणि २० टक्के संवर्धित असलेले अंदाजे २०० किलोग्रॅम फिशन मटेरियल असल्याचे मानले जात होते.7 / 10हा साठा त्या हल्ल्यांमध्ये लक्ष्य केलेल्या दोन मुख्य ठिकाणी केंद्रित असण्याची शक्यता आहे. इस्फहानमधील एक भुयारी मार्ग आणि नतान्झमधील एक प्रकल्प. गरज पडल्यास नवीन भूमिगत संवर्धन सुविधा उभारण्याची क्षमता इराणकडे अजूनही आहे असं आयएईएचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी सांगितले.8 / 10युरेनियम जप्त करण्याचा कोणताही प्रयत्न हा अलीकडच्या वर्षांत अमेरिकेने हाती घेतलेल्या सर्वात जोखीमेच्या मोहिमांपैकी एक असेल. अमेरिकन सैन्याला शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करावा लागेल, जिथे त्यांना इराणी हवाई संरक्षण, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांपासून धोका असेल. जमिनीवर उतरल्यावर सैन्य तो परिसर सील करून सुरक्षित करेल, तर विशेष पथके ढिगारे, भूसुरुंग आणि इतर सापळे टाळत युरेनियमचा शोध घेतील.9 / 10युरेनियम ४० ते ५० विशेष सिलिंडरमध्ये साठवलेले असल्याचे मानले जाते. जरी अमेरिकन सैन्याने युरेनियम जप्त केले तरी ते सुरक्षित उपकरणांमधून सुरक्षितपणे वाहून न्यावे लागेल, ज्यासाठी अनेक वाहनांची आवश्यकता भासू शकते. हे काही झटपट होणारे काम नाही असं यूएस सेंट्रल कमांडचे माजी कमांडर जोसेफ व्होटेल यांनी म्हटलं. 10 / 10जमिनीवरील परिस्थितीनुसार या मोहिमेला अनेक दिवस किंवा एक आठवडाही लागू शकतो. जर युरेनियम मिळवण्याच्या ठिकाणी योग्य विमानतळ उपलब्ध नसेल तर लष्कराला ते साहित्य वाहून नेण्यासाठी आणि हटवण्यासाठी स्वतःच एक विमानतळ बांधावे लागू शकते.