गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 09:58 IST2025-09-14T09:55:02+5:302025-09-14T09:58:02+5:30
Tommy Robinson: इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये नुकताचा एक मोठा मोर्चा निघाला. यया मोर्चाला लाखोंच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. तसेच उजव्या विचारसरणीच्या कट्टरतावादी आंदोलकांच्या हातात फलक आणि तोंडावर सरकारविरोधी घोषणा होत्या. स्थलांतरविरोधी कार्यकर्ता टॉमी रॉबिन्सन याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे आता एता आवाहनावर लाखोंची गर्दी जमवणारा टॉमी रॉबिन्सन कोण आहे याबाबत जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये नुकताचा एक मोठा मोर्चा निघाला. यया मोर्चाला लाखोंच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. तसेच उजव्या विचारसरणीच्या कट्टरतावादी आंदोलकांच्या हातात फलक आणि तोंडावर सरकारविरोधी घोषणा होत्या. स्थलांतरविरोधी कार्यकर्ता टॉमी रॉबिन्सन याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे आता एता आवाहनावर लाखोंची गर्दी जमवणारा टॉमी रॉबिन्सन कोण आहे याबाबत जगभरात चर्चा सुरू झाली आहे.
४१ वर्षीय टॉमी रॉबिन्सनचं खरं नाव स्टीफन याक्सली-लेलन असं आहे. त्याने अनेक वर्षांपर्यंत न्यायालय आणि तुरुंगात ये जा केलेली आहे. टॉमी रॉबिन्सन हे इस्लाम आणि ब्रिटनमधील वाढती स्थलांतरितांची समस्या आणि प्रसारमाध्यमांवर सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र आर्थिक मदत मागून मिळालेली रक्कम आपण मद्यपान आणि पार्ट्यांवर उधळल्याचेही त्यांनी मान्य केले होते.
२००९ साली रॉबिन्सन यांनी इंग्लिश डिफेन्स लीगची स्थापना केली होती. ही एक चळवळ होती. तसेच ती हिंसाचार आणि फुटबॉल होलिगनिझमशी जोडली गेली होती. दरम्यान, वाढत्या कट्टरतेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी २०१३ मध्ये या संघटनेचं नेतेपद सोडलं होतं. मात्र एक कार्यकर्ता आणि ऑनलाइन प्रचारक म्हणून ते कार्यरत होते.
रॉबिन्सन यांचं गुन्हेगारी रेकॉर्डही खूप मोठं आहे. त्यांच्याविरोधात हल्ला करणं, ओलीस धरणं, फसवणूक आणि कोर्टाची अवमानना असे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१८ मध्या एका सुनावणीदरम्यान लाईव्ह स्ट्रिमिंग केल्याने त्यांना तुरुंगवास झाला होता. तर २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने एका आदेशाची अवमानना केल्याप्रकरणी १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, सतत तीव्र आंदोलनं करणाऱ्या रॉबिन्सन यांनी आर्थिक अडचणींचाही सामना केला आहे. २०२१ मध्ये दिवाळखोर झाल्याची घोषणा केली होती. तसेच दान म्हणून मिळालेली लाखो पौंडांची रक्कम आपण जुगारामध्ये उडवल्याचेही त्यांनी कबूल केले होते. एवढं असूनही ते खूप प्रभावशाली व्यक्ती आहेत.
२०१८ साली त्यांना ट्विटरवरून बॅन करण्यात आले होते. मात्र एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करून त्याचं एक्स असं नामांतर केल्यानंतर रॉबिन्सन यांचं ट्विटरवर पुनरागमन झालं होतं. तसेच सध्या एक्सवर त्यांचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. विरोधकांच्या दृष्टीने रॉबिन्सन हे फुटिरतावादी आहेत. मात्र त्यांचे समर्थक त्यांना भाषण स्वातंत्र्य आणि देशभक्तीचे समर्थक मानतात.