'या' देशाने वृद्ध नागरिकांसाठी विशेष वाहतूक नियम बनविले; काय आहेत? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 03:09 PM2019-10-17T15:09:02+5:302019-10-17T15:10:42+5:30

रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव घेत सिंगापूरमध्ये वृद्ध नागरिकांसाठी विशेष वाहतूक नियम बनविण्यात आले आहेत.

या देशात वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती रस्ता पार करण्यासाठी एका कार्डद्वारे स्वाइप करु शकतात. यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात येते. १० वर्षापूर्वी संकल्पनेत आणलेली ही योजना आता प्रत्यक्षात आली आहे.

सिंगापूर सरकारद्वारे वाहतुकीच्या सिग्नलमध्ये सेंसर बसविण्यात आला आहे. ज्याला ग्रीन मॅन प्लस म्हटलं जातं. ज्यामध्ये वृद्ध स्वत:चे कार्ड स्वाइप केल्यानंतर सिग्नलची लाईट पेटली जाते. त्यानंतर रस्ता पार करेपर्यंत ही लाईट सुरु राहते.

सिंगापूर दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणात अधिक वृद्ध माणसं राहतात. २०१८ च्या जनसंख्येप्रमाणे जवळपास १३.५ टक्के वृद्ध लोक राहतात.

२००९ मध्ये या योजनेचा प्रयोग सिंगापूर शहरातील ५ वाहतूक रस्त्यांवर करण्यात आले होते. त्यानंतर आता ही योजना सगळीकडे सुरु करण्यात आली आहे.