Coronavirus: धक्कादायक! तुम्हालाही असू शकते कोरोनाची लागण; ‘फॉल्स निगेटिव्ह’ रुग्णांनी वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 04:34 PM2020-04-09T16:34:43+5:302020-04-09T16:39:21+5:30

चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात जगातील २०० पेक्षा जास्त देश अडकले आहेत. आतापर्यंत १५ लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर ८९ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तुम्हाला कोरोनाची लागण झाली नाही असं नाही. कारण अशी बरीच प्रकरणे सध्या समोर येत आहेत ज्यांच्यात सुरुवातीच्या तपासणीत कोरोनाची लागण नसल्याचं दिसून आलं. जगभरात असे बरेच रुग्ण आहेत ज्यांना खोकला, श्वास घेण्यास अडचण आणि ताप यासारखे कोविड -१९ च्या लक्षणांमुळे ग्रासले होते आणि त्यांची चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले

डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आणि लक्षणे वाढल्यानंतर परत येण्याची सूचना दिली. काही दिवसांनंतर, जेव्हा तब्येत अधिकच खराब होऊ लागली, तेव्हा हे लोक डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी पुन्हा तपासणीसाठी नमुने घेतले त्यानंतरही आलेला रिपोर्टही निगेटिव्ह आला.

याचे एक कारण म्हणजे तपासणी करताना नाकातून स्त्राव घ्यावा लागतो. यासाठी, स्वॉबला देखील बराच वेळ नाकात फिरवावे लागते. कमकुवत तंत्रज्ञानदेखील फॉल्स निगेटिव्हचं कारण होऊ शकतं. अशी प्रकरणे जी सुरुवातीला निगेटिव्ह आली होती नंतर पोझिटिव्ह आढळली. म्हणजे ते कोरोना संक्रमित होते पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांना फॉल्स निगेटिव्ह म्हटलं जातं.

सध्या, प्रचलित कोरोना स्क्रीनिंग पद्धतीमुळे संसर्ग पकडला जात नाही हे शक्य असेल. आरटी-पीसीआरची पॉलिमरेज चेन रिअॅक्शनद्वारे तपासणी केली जात आहे. यामुळे, श्वासोच्छ्वासात असलेल्या विषाणूचे कण आढळतात. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँन्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) म्हणते की काही वेळा जेव्हा कोणी निगेटिव्ह आढळतं त्यावेळी त्याचा अर्थ होऊ शकतो की, तपासणी करताना संक्रमण झालं नसेल.

अशा परिस्थितीत, चाचणीत तुम्हाला संक्रमण नाही असं होऊ शकतं. पण कोरोनाची लक्षणं आढळू शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे सध्या समोर आली आहे. दुर्दैवाने अशा लोकांचा कोणताही डेटा गोळा केला जात नाही. चीनमधील तज्ञांचे म्हणणे आहे की 30 टक्क्यापर्यंत कोरोना संक्रमित लोकांचे फॉल्स निगेटिव्ह आले असतील. बर्‍याच देशांमध्ये, डॉक्टरांनी असा अंदाज वर्तविला आहे की फॉल्स निगेटिव्हची संख्या अधिक असू शकते.

कोणताही चाचणी अहवाल अन्य केंद्रांचीही जुळाला पाहिजे. केवळ एक तपास रिपोर्ट योग्य मानणं धोक्यात टाकू शकतं. इतर डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा आणि चाचणीच्या परिणामांची त्यांच्या लक्षणांशी तुलना केली पाहिजे. आपल्यातला कोणीही संक्रमित असू शकतो भलेही त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल.

कोरोनाच्या जाळ्यात ८० टक्के लोक अशा लोकांमुळे संक्रमित होतात ज्यांना स्वत:मध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षण आढळून येत नाही. शांघायस्थित जिओ टोंग स्कूल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनाही असे आढळले आहे की एक व्यक्ती सरासरी 3.8 दिवसांनी दुसर्‍यास संक्रमित करते.

व्हायरस मुळापासून दूर करण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर आयसोलेशनसह तपासणी करणे आवश्यक आहे. जेणेकरुन विषाणू आढळेल पण त्या लोकांना याची कल्पनाही नसेल असं शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

जोपर्यंत संक्रमित व्यक्तीची ओळख होते तोपर्यंत तो दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित केलेला असतो. वुहानमधील रूग्णांवरील केलेल्या अभ्यासात हे दिसून आले की, बहुतेक लोक ज्यांना पूर्णपणे निरोगी दिसतात परंतु त्यांना कोरोनाची लागण झालेली असते.