CoronaVirus News: लस आली तरी कोरोना नाही संपणार; 'ही' मंडळी मोठा अडथळा ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 04:44 PM2020-07-07T16:44:12+5:302020-07-07T16:58:16+5:30

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. काही मोजक्या देशांना कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले असले तरी अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे.

कोरोनाचा जोर ओसरणे तर दूर अद्याप संसर्गाने उच्चांक गाठला नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे.

तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. मात्र कोरोनाची लस जरी बाजारात उपलब्ध झाली तरी प्रत्येकी सहा लोकांमधून एक व्यक्ती कोरोनाची लस टोचण्यास नकार देईल असं एका संशोधनाद्वारे समोर आले आहे.

ब्रिटिश टेलिग्राफच्या रिपोर्टनूसार, याआधी देखील एक सर्वे करण्यात आला होता. यामध्ये अमेरिका, जर्मनी आणि चेक रिपब्लिकमधील जवळपास लोकसंख्येनूसार ५० टक्के लोक कोरोनाची लस टोचणार नाही.

काही देशांमध्ये सोशल मीडियावर कोरोनाच्या लसीविरुद्ध आवाज उठवण्यात येत आहे. त्यामुळे अशी लोक कोरोनाला रोखण्यासाठी मोठा अडथळा ठरणार आहे.

खरंतर एखाद्या व्हायरसला रोखण्यासाठी कमीत कमी ६० ते ७० टक्के लोकांची रोग प्रतिकारकशक्ती जास्त असणं आवश्यक आहे. लोकसंख्येमधील ६० टक्के लोकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यास व्हायरसची साखळी तोडण्यास मदत होते. तसेच बाकीचे लोकांना व्हायरसपासून दूर राहण्यास मदत होऊ शकतो. मात्र अनेक लोकांनी लस टोचण्यास नकार दिला तर कोरोनाला रोखण्यास आपण यशस्वी होऊ शकत नाही.

सेंटर फॉर काउंटरिंग डिजिटल हेट (CCDH) नावाची संस्थेसाठी YouGov ने सर्वे केला होता. या सर्वेमधून माहिती समोर आली की, ब्रिटनमधील १६ टक्के वयोवृद्ध लोक लस टोचणार नाही. तसेच CCDHने जेव्हा सोशल मीडियावरील लसी विरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांची माहिती घेतली. तेव्हा कोरोनाचं संकट सुरु झाल्यापासून ८० लाख लोकांची संख्या वाढली आहे. याचवेळी ४०० ग्रुपमध्ये एकूण ५ कोटी ५० लाख फॉलोअर्स आहेत.

Read in English