CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:44 PM2020-07-11T13:44:11+5:302020-07-11T14:09:05+5:30

जगभरात जवळपास दीड लाख लोकांना कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले आहे. यापैकी 73 लाखहून अधिक लोक बरेही झाले आहेत. मात्र, आतापर्यंत 5.5 लाखहून अधिक लोकांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स यावर लवकरात लवकर औषध तयार करण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञ मंडळी विविध प्रकारच्या उपचार पद्धती शोधत आहेत. यात प्लाझ्मा थेरपी, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (HCQ), रेमडेसिवीर (remdesivir) आणि इतरही काही अँटी-व्हायरल मेडिकेशनचा समावेश आहे.

मात्र, तज्ज्ञांच्या मते, एक औषध असे आहे, ज्याचा वापर करून कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वात प्रभावी आणि सर्वात स्वस्त उपचार केला जाऊन शकते, त्या औषधाचे नाव आहे डेक्सामेथॅसॉन. Dexamethasone

डेक्सामेथॅसॉन सर्वात उपयोगी - इंल्डंमध्ये एका संशोधनात दावा करण्यात आला आहे, की सूज कमी करण्यासाठी वापरले जाणारे स्टेरॉइड डेक्सामेथॅसॉन COVID-19 च्या उपचारासाठी अत्यंत फायदेशी आहे. जे रुग्ण गंभीर आहेत, अशा रुग्णांचा जीव वाचवण्यासाटी हे औषध रामबाण ठरत आहे.

या औषधाच्या वापरानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या रुग्णांचा मृत्यूदर 33.33 टक्के तर कमी स्वरुपात गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर 20 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे.

'या'मुळे ​रेमडेसिवीरपेक्षाही प्रभावी आहे डेक्सामेथॅसॉन - कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठी सर्वात पहिले चर्चे आले ते हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन. मात्र, नंतर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. यानंतर रेमडेसिवीर कोरोना रुग्णांसाठी अधिक उपयुक्त असल्याचे मानले जात होते.

रेमडेसिवीर जेनेटिक कोडमध्ये बदल करून व्हायरलचा संसर्ग रोखते. एवढेच नाही, तर हिच्या वापराने रुग्ण लवकर बरे होत असल्याचा दावाही काही अभ्यासांत करण्यात आला. मात्र, प्रत्येक रुग्णावर त्याचा परिणाम सारखा नाही.

ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची हलकी लक्षणे आहेत, असेच रुग्ण रेमडेसिवीरमुळे आतापर्यंत बरे झाले आहेत. तर, डेक्सामेथॅसॉनचे साइड-इफेक्ट्स कमी आहेत आणि आतापर्यंत गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवरही या औषधाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

डेक्सामेथॅसॉन सर्वात प्रभावी आणि सुरक्षितही - डेक्सामेथॅसॉनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सहजपणे उपलब्ध होते. एवढेच नाही, तर मार्केटमध्ये कमतरता भासत असलेल्या इतर औषधांच्या तुलनेत डेक्सामेथॅसॉन अत्यंत स्वस्त आहे.

तज्ज्ञ मंडळी, डेक्सामेथॅसॉनच्या अॅडमिनिस्ट्रेशनसंदर्भात अभ्यास करत आहेत. अद्याप या औषधामुळे होणाऱ्या फारशा साइड-इफेक्ट्सची माहिती मिळालेली नाही. यामुळे हे आतापर्यंतचे सर्वात सुरक्षित औषध मानले जात आहे.

भारतातही हे औषध सहजतेने उपलब्ध होऊ शकते. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) हे औषध परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. मात्र व्हॅक्सीनवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचा वापर करू नये - डेक्सामेथॅसॉनचे सकारात्मक परिणाम नक्किच येत आहेत. यामुळे मृत्यूदरातही कमी येत आहे. मात्र, अद्याप या औषधासंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णायक अभ्यास समोर आलेला नाही. यासंदर्भात आणखी अभ्यास केला जात आहे. या औषधाला अद्यापही एक्सपेरिमेन्टल औषधच म्हटले जात आहे.

ज्या रुग्णांना हे औषध दिले जात आहे, त्यांनाही याचा अत्यंत कमी डोस दिला जात आहे. या ओषधाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास साइड-इफेक्ट्सदेखील होऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्याशिवाय याचा वापर केला गेला तर, पिंपल्स, अधिक घाम येणे, रॅश, हायपरग्लिसिमिया आणि स्नायुंचे दुखणे, आदी समस्या निर्माण होऊ शकतात.