coronavirus: कोरोनावरील औषधाचा शोध लावून केली कमाल, हे तीन शास्त्रज्ञ रातोरात झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 03:33 PM2020-07-27T15:33:19+5:302020-07-27T15:42:25+5:30

सध्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणाऱ्या औषधावर सुरू असलेल्या संशोधनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. जगभरातील शेकडो संशोधनन संस्था आणि डॉक्टर सध्या कोरोनावरील औषध शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

जगातील कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असल्याने सध्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणाऱ्या औषधावर सुरू असलेल्या संशोधनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. जगभरातील शेकडो संशोधनन संस्था आणि डॉक्टर सध्या कोरोनावरील औषध शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, बिटनमधील तीन प्राध्यापक कोरोनावरील औषध शोधून रातोरात करोडपती झाले आहेत. प्राध्यापक रटको जुकानोव्हिक, स्टीफन होलगेट आणि डोन्ना डेव्हिस यांच्या कंपनीच्या (सिनेरजेन) शेअरचे मूल्या रातोरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आतापर्यंत या तिन्ही शास्त्रज्ञांच्या कंपनीच्या शेअरचा भाव तब्बल तीन हजार पटींनी वाढला आहे.

प्राध्यापक रटको जुकानोव्हिक, स्टीफन होलगेट आणि डोन्ना डेव्हिस यांनी सिनेरजेन नावाची स्थापन केली आहे. या कंपनीने कोरोना विषाणूवरील एखा औषधाची चाचणी घेतली होता. या चाचणीमध्ये ज्या रुग्णांना कोरोनाचे औषध देण्यात आले होते. त्यांच्यापैकी ७९ टक्के रुग्णांची गंभीरपणे आजारी पडण्याची शक्यता कमी झाली आहे.

ब्रिटनमधील साऊथ्म्टन विद्यापीठाच्या मेडिसीन स्कूलमधील तिन्ही प्राध्यापकांनी सुमारे २० वर्षांपूर्वीच या औषधाचा शोध लावला होता. दमा आमि क्रोनिक लंग डिसीजच्या रुग्णामध्ये इन्टरफेरोन बीटा नावाच्या प्रोटीनची कमतरता असते, याचा शोध त्यांनी लावला होता. हे प्रोटीन कॉमन कोल्डशी लढण्यामध्ये मदत करते. दरम्यान, ज्या प्रोटीनची कमतरता आहे, त्याची पूर्तता केली गेल्यास व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यात रुग्णाला मदत मिळू शकते.

दरम्यान, आपण लावलेल्या शोधावर औषधाची निर्मिती करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी सिनेरजेन नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी २००४ मध्येच स्टॉक मार्केटमध्ये आली होती. मात्र कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर कंपनीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये इंटरफेरोन बीटा या प्रोटीनचा समावेश असलेल्या एसएनजी००१ या औषधाची वैद्यकीय चाचणी सुरू केली. त्यानंतर याच आठवड्यात या शोधाचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

चाचणीदरम्यान, रुग्णाच्या थेट फुप्फुसामध्ये एसएनजी००१ औषधाचे डोस दिले गेले. दरम्यान, या औषधामुळे रुग्णाच्या आजारपणातून बरे होण्याची शक्यता दोन ते तीन पटींनी वाढते. या वैद्यकीय चाचणीत १०१ लोकांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, या चाचणीचे अहवाल समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात उसळी आली आहे. या कंपनीमध्ये केवळ ०.५६ ते ०.५९ एवढी भागीदारी असूनही शेअरच्या किमतीत प्रचंड उसळी आल्याने या तिन्ही प्राध्यापकांना १५ ते १६ कोटी रुपये मिळाले.