CoronaVirus : चीननं आधी जगाला संकटात लोटलं; आता कोरोनाला संपवणारी अँटीबॉडी मिळवली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 05:14 PM2020-05-27T17:14:38+5:302020-05-27T17:25:01+5:30

CoronaVirus : विशेष म्हणजे कोरोनाचा जगभरात फैलाव झाल्यानं चीननं अनेक देशांना संकटात ढकललं.

कोरोनाच्या उत्पत्तीसाठी अमेरिका वारंवार चीनला जबाबदार धरत आहे. चीननं कोरोना विषाणूची माहिती जगापासून लपवल्याचाही आरोपही अनेक देशांकडून केला जात आहे.

. विशेष म्हणजे कोरोनाचा जगभरात फैलाव झाल्यानं चीननं अनेक देशांना संकटात ढकललं. आता चीननंच कोरोनाला संपवणारी अँटीबॉडी विकसित केल्याचा दावा केला आहे.

कोरोना विषाणूचा नाश करण्यास सक्षम ह्युमन न्यूट्रोलायझिंग अँटीबॉडीचा शोध लावला आहे, असा दावा चिनी वैज्ञानिकांनी केला आहे.

या अँटीबॉडीमुळे कोरोनावर औषध तयार करण्यासाठी आणि त्यावर चालू असलेल्या संशोधनात मदत मिळणार आहे.

नेचर वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या लेखानुसार, चिनी अ‍कॅडमी ऑफ सायन्सच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने, मानवी न्यूट्रोफिलिझिंग अँटीबॉडीज शोधून काढल्या आहेत, ज्या कोरोना विषाणूचा प्रभावीपणे उपचार करू शकतात.

चिनी शास्त्रज्ञांनी देखील त्याच्या क्लिनिकल चाचणीची तयारी सुरू केली आहे. शास्त्रज्ञांनीही त्याच्या पेटंटसाठी अर्ज सादर केला आहे.

मायक्रोबायोलॉजी इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, हे अँटीबॉडी संशोधनातून चिनी वैज्ञानिकांनी स्वतंत्रपणे शोधले आहेत.

भविष्यात या अँटीबॉडीसंदर्भात बर्‍याच क्लिनिकल चाचण्या केल्या जातील. विशेष म्हणजे यानंतर त्याचे औद्योगिक उत्पादन देखील सुरू केले जाणार आहे.

यान जिंहुआ, गाओ फू आणि वांग किहुई यांच्या नेतृत्वात इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या पथकांनी यासंदर्भातील संशोधनावर एक पत्र तयार केले आहे.

ज्यामध्ये असे लिहिले आहे की, संस्थेने कोरोना विषाणूवर जानेवारीपासूनच संशोधन सुरू केले. कोरोना विषाणूच्या रुग्णांकडून घेतलेल्या सिरमचा वापर करून डझनभर मानवी न्यूट्रोलायझिंग अँटीबॉडीज सापडले.

चाचणीदरम्यान, शास्त्रज्ञांना आढळले की, यापैकी दोन अँटीबॉडीज कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात पूर्णपणे यशस्वी आहेत. माकडांवर झालेल्या चाचणीत या अँटीबॉडीने त्यांची श्वसन प्रणाली पूर्णपणे सुधारली.

शास्त्रज्ञांनी सांगितले की अँटीबॉडीजच्या विकासासाठी तंत्रज्ञान हस्तांतरित झाल्यानंतर त्यावर क्लिनिकली चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येणार आहे.