शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : इटलीमध्ये कोरोनामुळे जीव गमावलेले लोक आधीच 'या' 10 आजारांचे होते शिकार, तुम्हीही आहात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 11:29 AM

1 / 11
कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 42,000 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. इटलीमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 12 हजारांपेक्षा जास्त लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा इतका का जास्त आहे याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने मोठा खुलासा केला आहे.
2 / 11
इटलीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने गेल्या 17 मार्चला एक रिपोर्ट जारी केला होता. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरसचं थैमान इटलीमध्ये सर्वात जास्त का बघायला मिळालं.
3 / 11
NIH ने कोरोना व्हायरसने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्री हेल्थसंबंधी काही महत्वाची माहिती मिळवली आहे. ज्यातून हे समोर येतं की, साधारण 99 टक्के लोक आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराचे शिकार होते.
4 / 11
रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, इटलीमध्ये मृत्यूमुखी पडणारे जवळपास 50 टक्के लोक तीन-तीन आजारांनी ग्रस्त होते. कोरोना व्हायरस हा इम्यूनिटी कमजोर असलेल्या आणि आधीच आजारी असलेल्यांना सहज शिकार करतो.
5 / 11
यावर डॉक्टरांचं मत आहे की, वयोवृद्ध लोकांसोबतच जे लोक आधीच काही आजारांनी ग्रस्त होते. त्यात हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा किडनीच्या रूग्णांची संख्या अधिक होती.
6 / 11
इटलीमध्ये कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडणारे 76.1 टक्के लोक हायपरटेंशन किंवा हाय ब्लड प्रेशरचे शिकार आढळून आले होते. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, अमेरिकेतही खूप लोक हाय ब्लड प्रेशरचे शिकार होते. या आजारामुळे लोकांची इम्यून सिस्टीम डाउन होते.
7 / 11
इटलीतील मृत्यूमुखी पडलेल्या 33 टक्के लोकांना हृदयरोग म्हणजे कार्डिओवस्क्यूलर डिजीजने ग्रस्त होते. अशा रूग्णांना फ्लू-इन्फेक्शन लवकर शिकार करतं.
8 / 11
इतकेच नाही तर एक चतुर्थांश लोकांची मृत्यूआधी हार्टबीट असामान्य आढळून आले होते. हार्टबीटची समस्येमुळे लोकांना ब्लड क्लॉट्स, स्ट्रोक किंवा हार्ट फेलसारखी समस्या होती.
9 / 11
कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये डायबिटीसच्या रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. इटली मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये 35.5 टक्के लोक डायबिटीसचे रूग्ण होते. तसेच मृतांमध्ये कॅन्सरने ग्रस्त रूग्णांची संख्याही अधिक होती. यातील साधारण 20.3 टक्के लोकांवर गेल्या 5 वर्षांपासून कॅन्सरचे उपचार सुरू होते.
10 / 11
तसेच 18 टक्के लोक हे क्रॉनिक किडनी डिजीजच्या समस्येचे शिकार होते. तर 9.6 टक्के लोकांना डेमेंशियाची समस्या होती. त्यासोबतच 13.2 टक्के लोका एम्फीसेमा आणि ब्रॉन्चिटिससारख्या गंभीर लंग्स समस्येचेगी शिकार होते.
11 / 11
जगभरात 8.5 लाखांपेक्षा अधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. तेच 42 हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. अशात हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी घरात राहून स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीHealthआरोग्य