कोरोना लस तयार व्हायला लागणार उशीर; माकडांच्या तुटवड्यानं संशोधन रखडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 07:37 PM2020-09-02T19:37:49+5:302020-09-02T19:50:30+5:30

जग भरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोनामुळे संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशात जगातील अनेक देशांत लवकरात लवकर कोरोनावरील लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अमेरिकेतील वैज्ञानिक संशोधनासाठी माकडं मिळत नसल्याने परेशाण झाले आहेत.

कोरोना लशीच्या परीक्षणासाठी वेळेवर माकडं मिळाली नाहीत, तर लस विकसित व्हायला वेळ लागेल, असा इशारा अमेरिकेतील संशोधकांनी दिला आहे.

कोरोना लशीच्या परीक्षणासाठी माकडांची मागणी वाढली आहे. सर्वच वैज्ञानिकांना परीक्षणासाठी माकडांची आवश्यकता आहे. मात्र मागणी वाढल्याने आणि पुरवठा कमी होत असल्याने अनेक लशींचे संशोधन रखडले आहे.

कोरोनामुळे संशोधनासाठी आवश्यक असलेल्या प्राण्याची कमतरता निर्माण झाली आहे. द नॅशनल प्रायमेट रिसर्च सेंटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बायोमेडिकल रिसर्चमध्ये प्रामुख्याने रीसस ( Rhesus) माकडांचा उपयोग होतो.

यासंदर्भात बोलताना, कॅलिफोर्निया नॅशनल प्रायमेट रिसर्च सेंटरचे कोएन वान रोमपे यांनी सांगितले, की संपूर्ण अमेरिकेतच या माकडांची कमतराता निर्माण झाली आहे.

तसेच, रिसर्च फर्म बायोइक्वलचे सीईओ मार्क लेविस यांनीही म्हटले आहे, की आता आम्हाला Rhesus माकडं मिळत नाहीत, ते पूर्ण पणे गायब झाले आहेत.

जगभरात अमेरिकेसह अनेक देशांना कोरोना लशीच्या परीक्षणासाठी माकडांची आवश्यकता आहे. मात्र, चीनमधून होणाऱ्या माकडांच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

अमेरिकेने गेल्या वर्षी तब्बल ३५ हजार माकडांची आयात केली होती. यात चीना वाटा साधारणपणे 30 टक्क्यांहून अधिक होता. मात्र, आता चीनने कोरोना व्हायरसचे कारण सांगून माकडांची निर्यात थांबवली आहे.

माकड आणि मानवाची इम्यून सिस्टिम साधारणपणे सारखीच असते. यामुळे कुठल्याही लशीच्या परीक्षणासाठी माकडांची अधिक आवश्यकता असते. कारण माकडावरील परीक्षणाशिवाय कोणत्याही लशीच्या मावी परीक्षणाला सुरुवात करता येत नाही. मात्र, माकडांची कमतरता निर्माण झाल्याने कोरोना लशीच्या परीक्षणात अडथळा निर्माण होत आहे, असे अमेरिकेती संशोधकांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, संक्रमण पसरू नये यासाठी, कोरोना व्हायरसने संक्रमित केलेल्या माकडांना ठेवण्यासाठी एक विशेष प्रकारची अॅनिमल बायोसेफ्टी लेव्हल-3 लॅबची आवश्यकता असते. अमेरिकेत अशा लॅब मोजक्याच आहेत.