शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 2:13 PM

1 / 8
कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. हा व्हेरिअंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी जगासमोर आणला आणि WHO ला त्याच्या तीव्रतेसंदर्भात माहिती दिली.
2 / 8
सध्या वैज्ञानिक या नव्या व्हेरिअंटसंदर्भात अधिकाधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी ओमायक्रॉनबद्दल एक नवा इशाराही दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे केवळ सौम्य प्रकारचाच आजारा होईल, असे सांगणे फारच घाईचे ठरेल.
3 / 8
वैज्ञानिकांनी बुधवारी एका प्रेझेंटेशनमध्ये सांगितले, की कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनचा नेमका कसा परिणाम होईल, हे ठरविणे घाईचे होईल. कारण याने सर्वाधिक तरुणांना लक्ष्य केले आहे. खरे तर तरुणांमध्ये रोगप्रतिकार शक्ती अधिक असते. असे लोक व्हायरसची लागण झाल्यानंतर काही दिवसांनी आजारी पडत आहेत.
4 / 8
नॅशनल इंस्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजनुसार (NICD) आता दक्षिण अफ्रिकेत कोरोना बाधितांची संख्या दुपटीने वाढू लागली आहे. येथे ओमायक्रॉन स्ट्रेन आता पूर्णपणे पसरला आहे.
5 / 8
आपल्या प्रेझेंटेशनमध्ये NICDचे प्रमुख मिशेल ग्रूम म्हणाले, 'लेटेस्ट इंफेक्शन प्रामुख्याने तरुणांमध्ये झालेले आहे. मात्र, तो वृद्धांवरही हल्ला करत आहे. एवढेच नाही, तर अशीही शक्यता आहे, की अधिक गंभीर समस्या काही आठवड्यांतच दिसू शकते.'
6 / 8
KRISP जिनोमिक्स इंस्टिट्यूटमधील संक्रमक रोग विषयाचे तज्ज्ञ रिचर्ड लेसेल्स म्हणाले, जरी हा विषाणू आणि प्रकार पूर्ण क्षमतेने लोकसंख्येमध्ये पसरला, तरी तो सर्व प्रथम अशा लोकांवर हल्ला चढवेल ज्यांचे लसीकरण अद्यापही झालेले नाही. हीच गोष्ट आम्हाला अधिक चिंतित करते.
7 / 8
पाश्चात्य देश आणि चीनच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे. 1.3 अब्ज लोकसंख्येच्या खंडात, केवळ 6.7% लोकांचेच पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे, कांगो डेमोक्रॅटिक रिपब्लिकमध्ये 100 मिलियन लोकांपैकी केवळ 0.1% लोकांनीच लस घेतली आहे.
8 / 8
प्रोफेसर लेसेल्स यांनी आशा व्यक्त केली आहे, की भलेही हा व्हेरिअंट अँटीबॉडीपासून वाचत असेल. पण शरिरातील इतर गोष्टींचा बचाव, जसे टी-सेल्स (T-cells), अजूनही प्रभावी असतील. टी-सेल्स या संक्रमित सेल्सना मारतात. आम्हाला आशा आहे, की गंभीर आजाराविरोधात आपल्याकडे जी सुरक्षा आहे, ती या व्हेरिअंटवर काम काम करू शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनSouth Africaद. आफ्रिकाCorona vaccineकोरोनाची लस