धक्कादायक दावा! चीन नव्हे, युरोपात होता कोरोनाचा पहिला रुग्ण; नोव्हेंबरमध्ये समोर आली होती पहिली केस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:48 PM2020-06-01T14:48:57+5:302020-06-01T15:24:27+5:30

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरस चीनमधूनच संपूर्ण जगात पसरला, असा आरोपही चीनवर सातत्याने होत आहे. अशातच, अता युरोपात कोरोनाचा पहिला रुग्ण 16 नोव्हेंबर 2019 रोजीच समोर आला होता, असा धक्कादायक दावा फ्रान्समधील वैज्ञानिकांच्या एका चमूने केला आहे.

इशान्य फ्रान्समधील एका रुग्णालयाने नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान रुग्णालयांत फ्ल्यूशी संबंधित 2,500हून अधिक लोकांच्या एक्स-रे रिपोर्टचा अभ्यास केला. यात केवळ नोव्हेंबर महिन्यातीलच दोन एक्सरे रिपोर्ट्समध्ये कोरोना व्हायरसची स्पष्टपणे पुष्टी झाली आहे. मात्र, त्यावेळी डॉक्टरांना याची माहिती नव्हती.

ईशान्य फ्रान्सच्या कॉलमार येथील अल्बर्ट श्वित्झर रुग्णालयाचे डॉक्टर मायकल श्मिट यांच्या चमूने दावा केला आहे, की कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये समोरच आला नसेल, असेही असू शकते. कारम कोरोनाचा संसर्ग नोव्हेंबरच्या मध्यातच युरोपात आला होता.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या रुग्णालयात 16 नोव्हेंबरला एका व्यक्तीचा एक्सरे काढण्यात आला होता. याचा अहवाल पाहून स्पष्ट होते, की तो कोरोनाबाधित होता. याच व्यक्तीवर दुसऱ्या दिवशीही टेस्ट करण्यात आली. यातही संबंधित व्यक्तीत कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आली होती.

नोव्हेंबर-डिसंबरमधील 2,500 एक्सरे रिपोर्टची चौकशी - फ्रान्सने 24 जानेवारीला देशात पहिला कोरोनाबाधित आढळल्याची पुष्टी केली होती. मात्र, या चमूने केलेल्या दाव्यानुसार, येथे पहिला रुग्ण 16 नोव्हेंबरलाच समोर आला होता.

डॉक्टर मायकल श्मिटयांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ फ्रान्सच नाही, तर युरोपातील अधिकांश देशांत आणि अमेरिकेतही, असे समोर आले आहे, की ज्याला 'केस झीरो' मानले जात होते, तो मुळात झीरो पेशन्ट नव्हताच आणि यामुळेच अनेक रुग्ण ट्रॅक झाले नाही आणि न कळतच कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढला.

या चमूच्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात झालेल्या एक्सरेचा अभ्यास केल्यानंतर समोर आले, की यात एकूण 12 जण असे होते, ज्यांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यांच्यात कोरोना संक्रमाणाची लक्षणे स्पष्टपणे दिसत होती.

इतर डॉक्टर्सदेखील म्हणाले, की हे खरे असू शकते - युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंगटनच्या ग्लोबल हेल्थ एक्सपर्ट्स आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर विन गुप्ता यांनीही या दाव्यांचा आणि एक्सरे रिपोर्ट्सचा अभ्यास केला. त्यांच्या मते एक्सरेमध्ये दिसत असलेल्या फुफ्फुसात, असा बदल दिसून येत आहे, जसा कोरोना संक्रमणामुळे होतो. मात्र, सर्वच एक्सरेमध्ये असे नाही.

हा चमू आता ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या एक्सरेचाही अभ्यास करत आहे. जेनेकरून खऱ्या झीरो रुग्णापर्यंत पोहोचता येईल. डॉक्टर मायकल श्मिट एनबीसीसोबत बोलताना म्हणाले, जोवर आपण पहिल्या रुग्णापर्यंत पोहोचू शकणारन नाही, तोवर आपण या संक्रमणापासून एक पाऊल मागेच राहू, आपल्याला हे कळूच शकणार नाही, की हा कुठून आला आणि याला कसे थांबवावे. जर आमचा दावा खरा असेल, तर तो देशांची कोरोना संक्रमणाविरोधातील असलेली नीतीच पूर्णपणे बदलून टाकेल.

यापूर्वी फ्रान्समधील डॉक्टर युव्स कोहेन यांनी दावा केला होता, की पॅरिसच्या इले-द-फ्रान्स रुग्णालयातही 27 डिसेंबरलाच कोरोना संक्रमाच्या पहिल्या रुग्णाची पुष्टी झाली आहे. डॉक्टर कोहेन यांच्या चमूनेही डिसेंबर आणि नोव्हेंबरच्या 24 रुग्णांच्या रिपोर्टचा अभ्यास केला होता. यात त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती.

कोहेन यांचे म्हणणे आहे, की काही असेही क्लस्टर आढळून आले होते, ज्यांच्या सोर्सची माहिती मिळत नव्हती आणि आता या प्रकरणांवरून सर्व धागे मिळत आहेत. डॉक्टर कोहेन यांच्या चमूने हे 24 रुग्णही कोरोनाबाधितच होते, असे घोषित केले आहे.

चीनमध्ये 17 नोव्हेंबरला आढळला पहिला रुग्ण - चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 17 नोव्हेंबरला आढळून आला. चीनमधील साउथ चायना मॉर्निंग पोस्ट या वेबसाइटनुसार, सरकारी दस्तऐवजांमध्येही त्या रुग्णाचे नाव नोंदवण्यात आले आहे. चीन प्रशासनाने, असे 266 संभाव्य कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण शोधले आहेत. ज्यांना हा आजार गेल्या वर्षी झाला होता.

कोरोना व्हायरससंदर्भातील व्हिसल ब्लोअर्सम्हणून काम करणाऱ्या, काही लोकांशी चर्चा केली असता, त्यांनी मुलाखतीत सांगितले, की डिसेंबर अखेरीस चीनच्या डॉक्टरांना समजले, की हा नव्या प्रकारचाच आजार आहे.

हुबेई प्रांतातील एका रुग्णालयाचे डॉक्टर झांग जिक्सियन यांनी 27 डिसेंबरला पहिल्यांदाच चीनच्या प्रशासनाला सांगितले, की एका नव्या प्रकारचा कोरोना व्हायरस पसरत आहे. तोवर जवळपास 180 रुग्ण समोर आले होते. यानंतर 31 डिसेंबरला चीनने कोरोना संक्रमण पसरत असल्याची अधिकृत घोषणा केली.

Read in English