CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:14 AM2020-06-29T08:14:51+5:302020-06-29T08:28:29+5:30

. जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये अतिसाराची लक्षणे आढळली आहेत. ही तीन लक्षणे जोडल्यानंतर सीडीसी यादीमध्ये कोरोना संसर्गाची एकूण 11 लक्षणे आढळली आहेत.

कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून, त्याची नवीन लक्षणेही समोर येत आहेत. आतापर्यंत ताप, श्वास घेण्यात अडचण, कोरडा खोकला आणि थकवा यांसारखे शारीरिक बदल कोरोना विषाणूची लक्षणे मानली जात होती.

. परंतु कोरोना संसर्गावर काम करणार्‍या अमेरिकन वैद्यकीय संस्थेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने कोरोना विषाणूच्या संभाव्य नव्या तीन लक्षणांची माहिती दिली आहे.

सीडीसीच्या माहितीनुसार, नाकातून रक्त येणे म्हणजे पीडित व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, असा होत नाही.

परंतु जर एखाद्या व्यक्तीचे नाक सतत वाहत असेल आणि त्याला आतून अस्वस्थता जाणवल्यास अशा व्यक्तीने ताप नसला तरीही कोरोनाची तपासणी करायला हवी. अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.

सीडीसीने कोरोनाचे दुसरे नवीन लक्षण नोंदवले आहे. एखाद्या व्यक्तीला वारंवार असामान्य वाटू लागले हे धोक्याचे संकेत आहे. अशा व्यक्तीने त्वरित स्वतःला अलगीकरणात ठेवले पाहिजे.

उलटी झाल्यास त्यानं तातडीनं चाचणी करून घेण्याची गरज आहे. जरी मळमळ होण्याची इतर कारणे असली तरी या हंगामात त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जर हे पुन्हा पुन्हा होत असेल तर आपण कोरोनाची चाचणी नक्कीच करा.

कोरोनाचे तिसरे नवीन लक्षण म्हणजे अतिसार. डॉक्टरांचा असा विश्वास होता की, कोरोना संक्रमित रुग्णांना अतिसारासारखी किंवा तत्सम लक्षणे आढळतात.

अखेर त्यावर सीडीसीने शिक्कामोर्तब केले आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये अतिसाराची लक्षणे आढळली आहेत.

ही तीन लक्षणे जोडल्यानंतर सीडीसी यादीमध्ये कोरोना संसर्गाची एकूण 11 लक्षणे आढळली आहेत. शरीरातील हे आठ बदल कोरोनाची संभाव्य चिन्हे मानली जात होती.

ताप आणि सर्दी, कफ, श्वास घेण्यात अडथळा, थकवा, शरीरावर वेदना, डोकेदुखी, चव नसणे, घसा खवखवणे आणि घसा खोकला ही आठ लक्षणे आहेत.

जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, आता कोरोना विषाणू संक्रमितांच्या संख्येनं 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

एकट्या अमेरिकेतच कोरोना विषाणूमुळे २५ लाखांहून अधिक लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना संक्रमणाच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.