इंजेक्शन, की नेजल स्प्रे? कशाने होईल कोरोनाचा लवकर खात्मा? व्हॅक्सीन एक्सपर्ट्ने केला असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:53 PM2020-09-01T23:53:40+5:302020-09-02T00:29:31+5:30

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरात शेकडो व्हॅक्सीन्सवर काम सुरू आहे. मात्र, एक आदर्श कोरोना व्हॅक्सीन कशी असेल आणि ती शरीरात गेल्यानंतर कशा प्रकारे काम करेल? यावर अद्याप ठोस दावा करण्यात आलेला नाही. मात्र, काही वैज्ञानिक नेजल स्प्रेच्या माध्यमातून (नाकातून) व्हॅक्सीन शरीरात पोहोचवणे अधिक योग्य पर्याय असल्याचे मानतात.

बर्मिंघम येथील अल्बामा युनिव्हर्सिटीच्या इम्यूनोलॉजिस्ट आणि व्हॅक्सीन डेव्हलपर फ्रान्सिस सांगतात, की क्लिनिकल ट्रायलमधील अधिकांश व्हॅक्सीन मसल्स इंजेक्शनच्या माध्यमानेच शरीरात सोडली जाते. व्हॅक्सीन हाताच्या वरच्या भागात लावली जाते. मसल्समधील इंजेक्शनचा इम्यूनवर चांगला परिणाम दिसून येतो. यामुळे अधिकांश व्हॅक्सीन डेव्हलपर येथूनच सुरू करतात.

फ्रान्सिसी 'अल्टइम्यून' या व्हॅक्सीन निर्माता कंपनीसोबत काम करतात. त्यांनी सांगितले, कि मसल्समध्ये इंजेक्शनचा अगदी 'सिस्टिमॅटिक रिस्पॉन्स' मिळतो, पण 'लोकल रिस्पॉन्स' मिळत नाही.

जेनेटिक अँटीबॉडीज, जी शरीराच्या वेगवेगळ्या भागांत रक्ताच्या माध्यमाने पोहोचवली जाते. त्याला सिस्टिमॅटिक रिस्पॉन्स, असे म्हटले जाते.

मात्र, कोरोना व्हायरस सारख्या एखाद्या रेस्पिरेटरी व्हायरसचे इंफेक्शन साधारणपणे नाक अथवा गळ्यापासूनच सुरू होते. अशा प्रकारचे इंफेक्शन इम्यूनिटीला घेरण्यापूर्वी बराचवेळ नाक आणि गळ्यातच राहते.

इंजेक्शनच्या माध्यमाने मसल्समध्ये दिली जाणारी व्हॅक्सीन रोग्याला एका मोठ्या धोक्यापासून तर वाचवू शकते, पण गळ्यात आणि नाकात औषध जात नसल्याने संसर्ग पसरण्याची भीती कायम राहते.

व्हॅक्सीन थेट नाकात गेल्यास एक वेगळ्या प्रकारची इम्युनिटी तयार होते. जी नाक आणि गळ्याच्या मधे आढळणाऱ्या एका लाइनच्या पेशीत असते.

फ्रान्सिसी यांनी सांगितले, की 'इंट्रानेजल रूट'च्या माध्यमाने दिली जाणारी व्हॅक्सीनदेखील सिस्टिमॅटिक इम्यूनिटीवर परिणाम दाखवते. सिस्टिमॅटिक इम्यूनिटी गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्याचे काम करते.

तर लोकल इम्यूनिटी नाक आणि गळ्यातील इंफेक्शनचा खात्मा करते. ज्यामुळे शिंकण्यातून अथवा खोकलल्यातून उडणाऱ्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमाने बाहेर इंफेक्शन पसरू शकते.