अभिनंदन! ६५ व्या वर्षी हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, लग्नसोहळा लंडनमधील चर्चमध्ये संपन्न 

By पूनम अपराज | Published: October 29, 2020 06:55 PM2020-10-29T18:55:10+5:302020-10-29T19:03:35+5:30

Harish Salve married Again : देशातील सर्वात महागडे वकील म्हणून हरिश साळवेंची ओळख आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया फी घेतली. हरिश साळवे कोर्टात एकदा हजर राहण्यासाठी साडे चार ते पाच लाख रुपये घेतात असंही बोललं जातं.

मराठमोळे ६५ वर्षीय ज्येष्ठ वकील हरिश साळवे लंडनमधील आर्टिस्ट कॅरोलिन ब्रॉसार्डसोबत दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत.

हरिश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती.

बुधवारी लंडनमधील चर्चमध्ये १५ पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न समारंभ पार पडला. या समारंभास काही ठराविक नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते

३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे विभक्त झाले होते. त्यांना दोन मुली आहेत.

तर कॅरोलिन ब्रॉसार्ड यांचंही हे दुसरं लग्न असून तिला १८ वर्षांची एक मुलगी आहे.

हरीश साळवे यांना घरातूनच वकिलीचे बाळकडू मिळालं असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे आजोबा पी. के. साळवे. ते प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. याशिवाय त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. हरीश साळवेंचे वडील वडील हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.

हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. १९९२ मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि १९९९ मध्ये त्यांना सॉलिसिटर जनरल म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

वकिली करण्याआधी ते सीए झाले. मात्र, नंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची पदवी मिळवली. वकील झाल्यापासून साळवेंनी अनेक मोठे खटले लढले आहेत.

यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे. हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे. यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे.

हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे.

संपूर्ण दिवसासाठी त्यांची फी २५ ते ३०लाख रुपयांपर्यंत सांगितली जाते. दिल्लीतील भगवान दास रोडवरील व्हाईट हाऊसमध्ये हरिश साळवे यांचं कार्यालय आहे. तर ते ज्या घरात राहतात त्याची किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जाते.

Read in English