चीनचा स्वत:च्या मित्र राष्ट्रांना ‘गुलीगत धोका’; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानसह केनियालाही फटका

By प्रविण मरगळे | Published: November 7, 2020 12:34 PM2020-11-07T12:34:56+5:302020-11-07T12:38:08+5:30

चीनच्या लबाडीबद्दल कोणाला माहिती नाही? असं क्वचितच असेल, व्यापाराच्या नावाखाली त्याने स्वत: चा मित्र असलेल्या देशांची फसवणूक केली आहे. खराब शस्त्रे विकून चीनने अनेक मित्र राष्ट्रांचा विश्वासघात केला आहे. पुन्हा एकदा चीनची लबाडी उघड झाली आहे.

होय, ज्यांना चीन आपला मित्र देश म्हणतो त्या लोकांचा विश्वास चीनने मोडला आहे. आपल्या देशात खराब झालेल्या आणि सदोष शस्त्रास्त्रांची निर्यात करून चीन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चीन हा जगातील पाचवा क्रमांकाचा शस्त्रास्त्र निर्यात करणारा देश आहे.

चीनने आपल्या मित्र देशांना पुरवलेली बहुतेक शस्त्रे खराब असल्याचे आढळलं गेलं आहे, कोरोना काळातही चीनने अनेक देशांना निकृष्ट दर्जाचे पीपीई किट्स्, मास्क पाठवले होते अशा अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या.

चीनने सन १९७० मधील मिंग श्रेणीतील 035 G पाणबुड्या बांगलादेशला २०१७ मध्ये विकल्या. या पाणबुड्यांचे मूल्य सुमारे १०० मिलियन डॉलर इतके होते, या पाणबुड्यांचा उपयोग फक्त लढाऊ प्रशिक्षणात केला जात होता. या पाणबुड्या सर्व्हिस करण्यासही सक्षम नव्हत्या.

एप्रिल २००३ मध्ये चीनकडून खरेदी केलेली मिंग क्लास पाणबुडी अपघाताला बळी पडली. त्याचप्रमाणे बांगलादेशने चीनमधून बीएनएस ओमर फारूक आणि बीएनएस अबू उबैदा ही दोन युद्धनौका खरेदी केली होती. यामध्ये नॅव्हिगेशन रडार आणि तोफा यंत्रणेत बिघाड असल्याचं आढळलं आहे.

बांगलादेशने नाकारलेली चीनची (Y12e आणि एमए 60) सहा विमान नेपाळने त्याच्या राष्ट्रीय विमान कंपनीसाठी खरेदी केली. पण ही सर्व विमान नेपाळमध्ये पोहोचताच निरुपयोगी झाली होती. हे विमान नेपाळसारख्या देशासाठी योग्य नव्हते आणि त्याचे सुटे भागसुद्धा उपलब्ध नव्हते.

चीनचा खास मित्र असलेल्या पाकिस्तानलाही चीनच्या लबाडीचा फटका बसला आहे, चीननेही मैत्रीच्या आडून पाकिस्तानला खराब युद्ध साहित्य दिलं होतं, चीनने पाकिस्तानला युद्ध एफ 22 पी दिले होते. काही काळानंतर बर्‍याच तांत्रिक अडचणींमुळे ती खराब झाली.

सप्टेंबर २०१८ मध्ये चीनने पाकिस्तानला या युद्धनौकाची पूर्ण सेवा देण्याची ऑफर दिली होती, परंतु चीनने त्यातकाही फायदा होत नसल्याने त्याकडे लक्ष दिले नाही.

पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश जेव्हा केनियाने सैनिकांसाठी बख्तरबंद वाहने खरेदी केली तेव्हा चीनच्या विक्री प्रतिनिधीने त्या गाड्यांची टेस्ट करताना गाडीत बसण्यास नकार दिला.

केनियाला त्यावेळी गाड्यांची गरज होती. चीनकडून केनिया गाड्या खरेदी केल्या त्यानंतर यात आलेल्या तांत्रिक समस्यांमुळे अनेक केनियन सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता.