अँटिबॉडी इंजेक्शनमुळे Coronavirus ची जोखीम कमी; रिपोर्टमधून दिलासादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 07:47 AM2021-10-12T07:47:39+5:302021-10-12T07:59:40+5:30

Coronavirus च्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बाब आली समोर. यामुळे मृत्यूची जोखीमही कमी होत असल्याचा दावा.

इजेक्शनच्या माध्यमाधून देण्यात आलेल्या अँटीबॉडी (Antibody) उपचारामुळे कोरोनाच्या (Coronavirus) प्रभावामुळे होणारा मृत्यूचा धोका कमी झाला आहे, अशी माहिती ब्रिटिश-स्विडिश बायोफार्मास्युटिकल कंपनी अँस्ट्राझेनकानं (AstraZeneca) सोमवारी दिली.

कमी ते मध्यम लक्षणं असलेल्या कोरोनाबाधितांना देण्यात आलेल्या उपचाराच्या तुलनेत हे प्रभावी आहे जे रूग्णालयात दाखल नाही, कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार AZD7422 च्या टॅकल तिसऱ्या टप्प्यातील कोरोना उपचार परीक्षणातून हे प्राथमिक लक्ष्य मिळाल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

इंजेक्शनद्वारे AZD7422 च्या ६०० मिलीग्रामच्या एकता डोसमुळे गंभीर प्रकारचा कोविड किंवा (कोणत्याही कारणानं) मच्यू होण्याची जोखीम सात दिवस किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीच्या लक्षण असलेल्या रुग्णालयात दाखल न केलेल्या रुग्णांनी देण्यात आलेल्या उपचाराच्या ५० टक्क्यांपर्यंत कमी आहे. AZD7422 सा तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारीसोबत दीर्घकालिन सक्रिय अँटिबॉडी असल्याचं या अभ्यासातून म्हटलं आहे.

"AZD7442 साठी हे महत्त्वपूर्ण परिणाम, आमचे दीर्घकालीन सक्रिय अँटीबॉडीचे एकत्रीकरण, कोविड १९ च्या प्रतिबंध आणि उपचार या दोन्हीमध्ये या पद्धतीचा वापर करण्याच्या पुराव्यामध्ये भर घालतात" अशी प्रतिक्रिया अॅस्ट्राझेनकाच्या बायोफार्मास्युटिकल्स आरअँडडीचे कार्यकारी उपाध्यक्ष मेने पांगलोझ यांनी सांगितलं.

डिसेंबर २०२० मध्ये ब्रिटिश आरोग्य नियामक संस्थेची मंजुरी मिळण्यापूर्वीच अॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे विकसित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीनं (Coronavirus Vaccine) विजयाचा फॉर्म्युला मिळवला असल्याचा दावा केला होता.

ही लस १०० टक्के सुरक्षित आहे आहे. Pfizer-BioNtech ची लस ९५ टक्के आणि मॉडर्नाची लस ९४.५ टक्के प्रभावी आहे. तर आपली लस १०० टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीचे सीईओ पास्कल सोरियोट यांनी संडे टाईम्सशी बोलताना यापूर्वी सांगितलं होतं.

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी रशियाने सर्वप्रथम स्पुतनिक-V नावाने लस बनवली होती. मात्र या लसीला विकसित करणारी कंपनी गेमालेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ अपिडोमिलोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीविरोधात चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार यूकेमधील ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनका लसीची ब्ल्यूप्रिट रशियन गुप्तहेरांनी चोरली होती. त्यानंतर त्याचा वापर करून स्पुतनिक-V लस विकसित करण्यात आली असा दावा करण्यात आला होता.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय असलेल्या क्रेमलिनमधील गुप्तहेरांनी ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनका लसीचा फॉर्म्युला चोरला. त्यानंतर त्याचा वापार स्वत:ची लस विकसित करण्यासाठी केला, असं द सननं संरक्षणविषयक सूत्रांनी मंत्र्यांना सांगितल्याचं म्हटलं.

लसीची ब्ल्यूप्रिंट आणि इतर महत्त्वाची माहिती एका परकीय एजंटकडून वैयक्तिररीत्या चोरण्यात आली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपण स्पुतनि-V लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यांनी रशियन नागरिकांनाही लस घेण्याचे आवाहन केलं होतं. स्पुतनिक-V लसीला आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्याप मान्यता मिळालेली नाही.मात्र असं असलं तरी ७० देशांनी तिच्या वापराला मान्यता दिली आहे.

Covaxin आणि Covishield प्रमाणेच स्पुतनिक-V लससुद्धा पूर्णपणे सुरक्षित आहे. चाचणीच्या निकालांच्या आधारावर स्पुतनिक-V लसीचा एफिकेसी रेट ९१.६ टक्के आहे. तसेच या लसीचे कुठलेही साईड इफेक्ट अद्याप समोर आलेले नाहीत. ही लस घेतल्यानंतर इतर लसींप्रमाणेच ताप, थकवा असे सर्वसाधारण साईड इफेक्ट दिसून येतात.

स्पुतनिक-V लसीचे दोन डोस घेतले जातात. ही लस कोविशिल्ड लसीप्रमाणेच व्हायरल व्हेक्टर प्लॅटफॉर्ममध्ये एडोनोव्हायरसचा वापर करून तयार करण्यात आली आहे. या लसीच्या दोन डोसमध्ये २१ दिवसांचं अंतर ठेवलं जातं.

तसंच ही लस २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये सहजपणे स्टोअर करता येते. स्पुतनिक-V लसीचा डोस १८ वर्षांवरील कुठल्याही व्यक्तीला दिला जाऊ शकतो. मात्र गर्भवती महिलांना या लसीचा डोस देण्याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. स्पुतनिक-V च्या चाचणीमध्ये मुलं आणि गर्भवती महिलांचा समावेश केला गेला नव्हता.