शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:35 IST

1 / 6
ऑपरेशन सिंदूरवेळी भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी नौदल पळून गेले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारताने जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला होता तेव्हा पाकिस्तानी नौदलाने कराची बंदरातून युद्धनौका हटविल्या होत्या. तसेच काही युद्धनौका या इराणच्या दिशेने पाठवून दिल्या होत्या, असे सॅटेलाईट फोटोंवरून समोर येत आहे.
2 / 6
भारताला प्रत्तूत्तर दिल्याचा आवा तेव्हा पाकिस्तान आणत होता. परंतू, तेव्हा पाकिस्तान लढण्याऐवजी आपल्या युद्धनौका कशा लपविता येतील याच्या मागे लागला होता. काही युद्धनौका व्यापारी जहाजांच्या टर्मिनलमध्ये नेल्या होत्या, तर काही युद्धनौका इराणच्या सीमेवर पाठविण्यात आल्या होत्या.
3 / 6
पाकिस्तानने कराचीपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या ग्वादरकडे युद्धनौका पाठविल्या होत्या. भारत कराची बंदरावर हल्ला करणार असल्याची खात्री पाकिस्तानला झाली होती. १९७१ मध्ये भारताने कराची बंदरावर विनाशकारी हल्ले चढविले होते. यामुळे पाकिस्तानकडे त्या जखमा होत्याच. यामुळे पाकिस्तानने महत्वाच्या युद्धनौका व्यापारी जहाजांमध्ये लपविल्या होत्या.
4 / 6
सॅटेलाईट फोटोनुसार व्यावसायिक कार्गो बंदरात तीन युद्धनौका एकत्र दिसत आहेत. दुसऱ्या कार्गो टर्मिनलमध्ये आणखी एक युद्धनौका दिसत आहे. युद्ध वाढले तर भारतीय नौदल कराची बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त करेल, अशी भीती पाकिस्तानला वाटत होती. भारताची विमानवाहू युद्धनौका हल्ल्याच्या तयारीतही होती. परंतू आदेश आले नाहीत, यामुळे पाकिस्तानचे कराची बंदर वाचले.
5 / 6
भारताने ६-७ मे च्या रात्री पीओके आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. तर हे सॅटेलाईट फोटो ८ मे रोजीचे आहेत. अंतराळ कंपनी मॅक्सर टेक्नॉलॉजीजकडून इंडिया टुडेने हे फोटो मिळविलेले आहेत.
6 / 6
यानुसार झुल्फिकर-क्लास फ्रिगेटपैकी अर्ध्या युद्धनौका, सोबत इतर जहाजे इराणी सीमेपासून फक्त 100 किमी अंतरावर म्हणजेच ग्वादर बंदराजवळ नेऊन ठेवण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरच्या फक्त सहा महिने आधी पाकिस्तानच्या नौदलाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे 350 किमीपर्यंत मारा करू शकते, त्याची चाचणी केली होती. तसेच ते झुल्फिकर-क्लास फ्रिगेटवर तैनात केले होते, असाही दावा केला होता.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल