CoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 03:11 PM2020-05-29T15:11:28+5:302020-05-29T15:17:25+5:30

CoronaVirus चीननेही गेल्या आठवड्यापासून तैवानसारख्याच खाडीमध्ये मोठ्या काळाचा युद्धसराव सुरु केला आहे. यामुळे त्यांनी २००० किलोमिटरचे क्षेत्र बंद करून टाकले आहे. तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीनसोबत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अमेरिकेने आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसरावाचे आयोजन केले असून भारतासह २५ देश यामध्ये सहभागी होणार आहेत.

हा नौदलाचा युद्धाभ्यास आहे. RIMPAC असे या मोहिमेचे नाव ठेवण्यात आले असून यावेळी चीनला निमंत्रण देण्यात आलेले नाही. १७ ते ३१ ऑगस्टपर्यंत हा युद्धसराव केला जाणार आहे. यामध्ये २५ देशांच्या नौसेना एकमेकांसोबत सहकार्य आणि युद्धाचे डावपेच शिकणार आहेत.

महत्वाचे म्हणजे चीननेही गेल्या आठवड्यापासून तैवानसारख्याच खाडीमध्ये मोठ्या काळाचा युद्धसराव सुरु केला आहे. यामुळे त्यांनी २००० किलोमिटरचे क्षेत्र बंद करून टाकले आहे. तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

प्रशांत महासागरातमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या ताफ्याचे कमांडरांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संक्रमनामुळे यावेळी केवळ समुद्रातच युद्धसराव केला जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या देशांच्या सैनिकांना एकमेकांसोबत ताळमेळ ठेवणे शिकता येणार आहे.

कोरोना काळामध्ये सोशल डिस्टेंन्सिंग वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात कोणत्याही प्रकारचे सेमिनारही आयोजित करण्यात येणार नाही.

२०१८ मध्ये असाच युद्धसराव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहभागी झालेल्या देशांनाच निमंत्रण देण्यात येत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, ब्रुनेई, कॅनडा, चिली, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इस्त्रायल, जपान मलेशिया, मेक्सिको, नेदरलँड, न्युझीलंड, पेरु, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, टोंगा, युके आणि व्हिएतनामच्या नौदलांना बोलविण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसचा उद्रेक चीनमधून झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. यामुळे चीनला या युद्धसरावाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. RIMPAC 2018 मध्ये चीनला निमंत्रण देण्यात आले होते, मात्र अमेरिकेने नंतर ते मागे घेतले होते.

तर यंदाच्या युद्धसरावामध्ये सहभागी होण्यात ब्राझील आणि इस्त्रायलने असमर्थता दर्शविली आहे. मात्र, दोन्ही देशांनी आवर अधिकृतरित्या काहीच सांगितलेले नाही.

या युद्धसरावामध्ये मल्टीनॅशनल अँटी सबमरीन वॉर, मेरीटाईम इंटरसेप्ट ऑपरेशन, लाईव्ह फायर ट्रेनिंग इव्हेंटसह अन्य गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या मोहिमेमध्ये सहभाग घेणारे देश आपासपात ताळमेळ ठेवण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचेदेखील आयोजन केले जाणार आहे.