अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:29 IST
1 / 10पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात अलीकडेच झालेल्या संघर्षामुळे ड्युरंड लाइन पुन्हा चर्चेत आली आहे, जी दोन्ही देशांमधील सीमारेषा आहे. काही दिवसांपूर्वी कतारकडून जारी सीजफायर स्टेटमेंटमध्ये ड्युरंड लाईनला बॉर्डर म्हटल्याने अफगाणिस्तानी अधिकारी नाराज झाले होते. ज्यानंतर कतारने त्यांचे निवेदन दुरूस्त करून पुन्हा जारी केले.2 / 10पहिल्या निवेदनात कतारने म्हटले होते की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या बंधू देशांमधील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कतार आवश्यक मदत करेल त्यासोबतच या प्रदेशात कायमस्वरूपी सलोख्यासाठी एक भक्कम पाया रचेल असं त्यांनी म्हटलं होते.3 / 10ड्युरंड रेषा म्हणजे काय? - अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषा १८९३ मध्ये हिंदू कुशमध्ये तयार करण्यात आली होती, जी अफगाणिस्तान आणि ब्रिटिश भारताला आदिवासी क्षेत्रांशी जोडते. ही १९ व्या शतकात रशियन आणि ब्रिटिश साम्राज्यांमधील ग्रेट गेमची एक झलक आहे, ज्यामध्ये ब्रिटिशांनी पूर्वेकडील भीतीदायक रशियन विस्तारवादापासून अफगाणिस्तानचा बफर म्हणून वापर केला.4 / 10१८९३ मध्ये सर हेनरी मॉर्टिमर ड्युरंड आणि तत्कालीन अफगाण शासक अमीर अब्दुर रहमान यांच्यात एक करार झाला, ज्यातून ड्युरंड रेषा अस्तित्वात आली. दुसऱ्या अफगाण युद्धाच्या समाप्तीनंतर दोन वर्षांनी १८८० मध्ये अब्दुर रहमान राजा बनले होते. 5 / 10या युद्धात ब्रिटिशांनी अफगाण साम्राज्याचे अनेक भाग ताब्यात घेतले होते. ड्युरंडशी केलेल्या त्यांच्या कराराने भारतासोबतच्या 'अफगाण सीमेवर' त्याच्या आणि ब्रिटिश भारताच्या 'प्रभाव क्षेत्रांच्या' सीमा निश्चित केल्या. या सात कलमांच्या करारात चीनच्या सीमेपासून अफगाणिस्तानच्या इराणच्या सीमेपर्यंत पसरलेली २,६७० किलोमीटर लांबीची रेषा ओळखली गेली.6 / 10१९४७ मध्ये ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानला ड्युरंड रेषा वारशाने मिळाली आणि त्यासोबतच पश्तूनांनी ही रेषा स्वीकारण्यास नकार दिला आणि अफगाणिस्तानने ती ओळखण्यास नकार दिला.7 / 10इस्लामाबाद ड्युरंड लाईनला आंतरराष्ट्रीय सीमा मानतो. अफगाणिस्तान हे नाकारतो. तालिबानसह मागील अफगाण सरकारांनी याला पश्तून आदिवासी जमिनींचे विभाजन करणारे आणि अफगाण सार्वभौमत्वाला कमकुवत करणारे कृत्रिम विभाजन म्हणून वर्णन केले आहे.8 / 10अलीकडच्या काळात ही सीमारेषा दोन्ही देशांमधील तणावाचे एक प्रमुख कारण बनली आहे, इस्लामाबादने त्यावर कुंपण उभारले आहे आणि अफगाणिस्तानचे रक्षक तिचे काही भाग पाडत आहेत. अफगाणिस्तान ही रेषा 'वसाहतवादी अवशेष' म्हणून नाकारत असले तरी पाकिस्तानसाठी ती प्रादेशिक अखंडतेची बाब आहे.9 / 10नुकतेच ड्युरंड सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारामुळे अफगाणिस्तानमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यानंतर अफगाणी नागरिकांनी आणि तालिबान सैनिकांनी पाकिस्तानचे तुकडे करण्याची आणि त्यांच्यावर जोरदार पलटवार करण्याची धमकी दिली आहे. 10 / 10पाकिस्तानकडून सातत्याने 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) च्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. पाकिस्तानने अनेकदा अफगाण हद्दीत हवाई हल्ले आणि गोळीबार केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.