1 / 10रशिया-युक्रेन युद्ध आणि नाटोविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाच्या वातावरणात रशियाच्या सामान्य नागरिकांच्या विचारात बदल झाला आहे. रशियात झालेल्या एका राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात रशियातील जनतेने जर्मनी हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू देश असल्याचे म्हटलं आहे. पहिल्यांदाच जर्मनीनं रशियन लोकांच्या नजरेत अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांना मागे सोडले आहे.2 / 10रशियात झालेल्या सर्वेक्षणात ५५ टक्के लोकांनी जर्मनीला प्रमुख शत्रू असल्याचं म्हटलं तर ४० टक्के लोकांनी अमेरिकेचे नाव घेतले. ४९ टक्क्यांसह ब्रिटन दुसऱ्या नंबरवर आहे. तर ज्या देशासोबत मागील ३ वर्षापासून युद्ध सुरू आहे त्या युक्रेनला ४३ टक्के लोकांनी शत्रू असल्याचे सांगत तिसऱ्या नंबरवर ठेवले आहे.3 / 10विशेष म्हणजे जर्मनीला शत्रू मानणाऱ्या लोकांची संख्या मागील काही वर्षात प्रचंड वाढली आहे. २०२० मध्ये हाच आकडा जवळपास १५ टक्के इतका होता. हा सर्व्हे मॉस्को येथील स्वतंत्र शोध संस्था Levanda Center द्वारे करण्यात आला आहे. ज्यात १६१३ रशियन नागरिकांची मते जाणून घेतली. 4 / 10जर्मनीविरोधात रशियाच्या रागाचे कारण काय? - युक्रेन युद्धावेळी जर्मनीने पाश्चात्य देशांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त सक्रीय भूमिका निभावली. त्याने ना केवळ युक्रेनला आधुनिक हत्यार दिले आणि सैन्य प्रशिक्षणही दिले होते तर रशियाविरोधात आर्थिक निर्बंधांमध्येही जर्मनीने पुढाकार घेऊन महत्त्वाची भूमिका निभावली. 5 / 10जर्मनीने त्यांच्या पारंपारिक शांतता धोरणाच्या बाहेर येत युक्रेनला टँक, एअर डिफेन्स सिस्टम आणि आर्टिलरी सिस्टम पोहचवली. सोबतच तत्कालीन चांसलर ओलाफ शॉल्ज यांनी रशियाला युरोपीय देशांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचं विधानही केले होते. नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन स्फोटावेळीही जर्मनीने ज्या प्रकारची भूमिका घेतली त्याला रशिया विश्वासघात म्हणून बघते.6 / 10रशिया आणि जर्मनी यांचा संबंध इतिहासात खूप दृढ आणि गुंतागुंतीचा राहिला आहे. पहिल्या महायुद्धात दोघेही समोरासमोर होते. दुसऱ्या महायु्द्धात हिटलरच्या नेतृत्वात जर्मनीने रशियावर भीषण हल्ला केला होता. ज्यात सोवियत संघाने २.७ कोटी लोकांच्या मृत्यूची किंमत देऊन जर्मनीला पराभूत केले होते. शीतयुद्धानंतर दोन्ही देशांनी व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात जवळचे संबंध विकसित केले परंतु युक्रेन युद्धाने हे संतुलन पूर्णपणे बिघडवले.7 / 10रशियातील लोकच जर्मनीबाबत हा विचार ठेवतात असं नाही. जर्मनीतही अलीकडे झालेल्या सर्व्हेत ७९ टक्के जर्मन लोकांनी रशिया जागतिक शांततेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले. ६६ टक्के लोकांनी रशिया जर्मनीच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीला आव्हान देत असल्याचे म्हटलं आहे.8 / 10५४ टक्के जर्मनीतील लोकांच्या मते रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या बाजूने ठाम राहण्यास सांगितले तर ६७ लोकांनी जर्मनीने युक्रेनला सैन्य सहकार्य करण्याचेही मत मांडले आहे. ४० टक्के लोक सध्याचा पाठिंबा पुरेसा असल्याचे बोलतात. रशिया- ब्रिटन यांच्यातील शत्रूता नवीन नाही. रशिया-ब्रिटन यांच्यातील राजघराण्यात कौटुंबिक नाते असले तरी दोघेही एकमेकांचे विरोधक आहेत.9 / 10युक्रेन युद्धात ब्रिटननेही कठोर भूमिका घेतली. ब्रिटनने रशियाविरोधात आर्थिक निर्बंध लावलेच परंतु त्याशिवाय युक्रेनी सैन्याला शस्त्रे आणि प्रशिक्षण देण्यासही पुढाकार घेतला. मात्र रशियाच्या सर्वेक्षणात ४९ टक्के लोकांनी ब्रिटन नंबर दोनचा शत्रू असल्याचे सांगत जर्मनीच्या मागे सोडले आहे. 10 / 10डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावावरून रशियाच्या मनात वर्षानुवर्षे वरचढ असलेली अमेरिका विरोधी भावना आता तुलनेने कमी झाली आहे असं दिसून येते. अमेरिकेविरुद्ध स्पर्धात्मक भावना निर्माण होत असताना जर्मनीबाबत रशियामध्ये पुन्हा एकदा विश्वासघाताची भावना निर्माण झाली आहे असं विश्लेषक सांगतात.