अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:53 IST2025-11-05T20:43:13+5:302025-11-05T20:53:32+5:30
चीनच्या अंतराळ स्थानकाला अंतराळात मोठा ढिगारा धडकला आहे. यामुळे आता क्रूचे परतण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. चिनी अंतराळ संस्थेने अंतराळवीरांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

अंतराळात मोठी दुर्घटना टळली आहे. चीनच्या स्पेस स्टेशनला एक मोठा ढिगारा धडकला. यामुळे क्रूचे नियोजित परतीचे वेळापत्रक आता बदलण्यात आले.

त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले. अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अंतराळ संस्थेने म्हटले आहे.

चीन दर सहा महिन्यांनी स्टेशनच्या क्रूमध्ये बदल करतो. शनिवारी, क्रूला घेऊन जाणाऱ्या शेन्झोउ-२० अंतराळयानाने शेन्झोउ-२१ क्रूसह कक्षेत परतणे पूर्ण केले.

हे क्रू बुधवारी पृथ्वीवर परतणार होते. पण, या घटनेमुळे आता यामध्येबदल केला आहे.

मंगळवारी स्थानकावरील तीन सदस्यांच्या क्रूने नवीन क्रूला अंतराळ स्थानकात प्रवेश दिला. शेन्झोउ-२० या तीन क्रू सदस्यांनी, चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जी यांनी त्यांची सर्व नियोजित कामे पूर्ण केली आहेत.

बुधवारी उत्तर चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील डोंगफेंग लँडिंग साइटवर परतण्याचे नियोजन होते.

त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी, चीनने शेन्झोउ-२१ क्रूड स्पेसक्राफ्ट लाँच केले, यामध्ये तीन अंतराळवीरांना सहा महिन्यांच्या मोहिमेवर चिनी अंतराळ स्थानकात घेऊन गेले आहे.

















