गुड न्यूज ! या हॉस्पिटलमधील 8 नर्स एकाच वेळी राहिल्या प्रेग्नेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 19:41 IST2019-01-31T19:34:38+5:302019-01-31T19:41:34+5:30

अमेरिकेतील Illinois मधील एका हॉस्पिटलमधील 8 महिला कर्मचारी काही दिवसांच्या फरकाने प्रेग्नेंट राहिल्या होत्या.
एन्डरसन हॉस्पिटल पवेलियन फॉर वुमेन'च्या सात नर्स आणि एक टेक्निशिअन एकाच महिन्यात गरोदर राहिल्या.
या महिलांना “Elite 8" असे नाव देण्यात आले.
हॉस्पिटल प्रशासनानं आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर नवजात बालके आणि त्यांच्या आईंचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी मिळालेल्या 8 गुड न्यूजमुळे हॉस्पिटलमधील प्रत्येक जण आनंदित झाला होता, अशी प्रतिक्रिया येथील एका नर्सनं दिली.
जुलै महिन्यात या प्रेग्नेंट महिलांनी हॉस्पिटलबाहेर एक फोटो काढला होता.
यातील काही महिला कर्मचारी सुट्टी संपवून कामावर परतल्या आहेत
तर तीन महिला अद्याप मॅटरनिटी लीव्हवर आहेत.