Alexander Treasure: सिकंदरच्या काळातील खजाना सापडला; उंचावर वसवलेल्या शहराखाली 400 खोल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 03:32 PM2021-10-16T15:32:28+5:302021-10-16T15:40:22+5:30

Alexander Treasure in Turkey Blaundos: ब्लॉनडोस हे चारही बाजुंनी दरींनी घेरलेले आहे. म्हणजे हे शहर एका उंचावर वसलेले आहे. ब्लॉनडोसच्या लोकांनीच युसाकच्या घाटाच्या उतारावर नेक्रोपोलिस (Necropolis) चे निर्माण केले होते.

तुर्कस्तानमध्ये पुरातत्व विभागाने दगड कापून बनविण्यात आलेले 400 थडगे (मोठ्या खोल्या) शोधून काढले आहेत. ही थडगी 1800 वर्षे जुनी आहेत. आतून सुंदर वॉल पेंटिंग्स आहेत. म्हणजेच भिंतींवर पेंटिंग बनविण्यात आलेली आहेत. सोबत काही बहुमुल्य वस्तू मिळाल्या आहेत. या वस्तू म्हणजे खजाना आहे, खजाना. हे थडगे रोमन साम्राज्याच्या काळात दगडांमध्ये कोरण्यात आले होते.

तुर्कीच्या एजियन समुद्राच्या पूर्वेला 180 किमी दूरवर एक ऐतिहासिक शहर ब्लॉनडोस (Blaundos) मध्ये हे दगडातील थडगे मिळाले आहेत. हे शहर सिंकंदराच्या काळात वसविण्यात आले होते. हे शहर रोमन आणि बिझेनटाईन साम्राज्याचा काळात खूप महत्वाचे होते. गुहांमध्ये सार्कोफैगी (Sarcophagi) नावाची प्रक्रिया केली जात होती. यामध्ये मारल्या गेलेल्या प्राणी आणि माणसांना ठेवले जात होते. असे अनेक पिढ्या करण्यात आले होते.

तुर्कीच्या युसाक विद्यापीठातील पुरातत्व अधिकारी बिरोल कैन या उत्खनन कार्याचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, ब्लॉनडोसमध्ये या थडग्यांमध्ये लोक होते. म्हणजेच एका थडग्यामध्ये किंवात त्यापेक्षा अधिक थडग्यांमध्ये या लोकांना ठेवले जात होते. जेव्हा कोणी मेला तर त्याच्यावर अंतिम संस्कार इथेच केले जात होते. यानंतर ते बंद केले जात होते.

ब्लॉनडोस हे चारही बाजुंनी दरींनी घेरलेले आहे. म्हणजे हे शहर एका उंचावर वसलेले आहे. ब्लॉनडोसच्या लोकांनीच युसाकच्या घाटाच्या उतारावर नेक्रोपोलिस (Necropolis) चे निर्माण केले होते.

कैन यांनी सांगितले की, नेक्रोपोलिस बाबत पुरातत्ववाद्यांना गेल्या 150 वर्षांपासून माहिती होते. ब्लॉनडोसमध्ये या प्रकारे उत्खनन करण्यात आले नव्हते. यामुळे आम्ही 2018 मध्ये एका तंत्रानुसार उत्खनन सुरु केले. या जागेवरून आम्ही दोन मंदिरे, एक थिएटर, एक सार्वजनिक बाथरुम, एक जिम्नेशिअम, एक शहराचे द्वार रोमन साम्राज्याचा हिरो हेरुन (Heroon) ची समाधी आणि ही 400 थडगे खोदली आहेत.

बिरोल यांनी सांगितले की, या शहराच्या खाली अनेक धार्मिक, सार्वजनिक आणि नागरिक अवशेष आहेत. याचा शोध घेणे गरजेचे आहे. 2018 मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातील माणसांचे अवशेष मिळाले होते. यानंतर एका मागोमाग एक असे 400 थडगी सापडली.

नेक्रोपोलिस ही लुटारुंची आवडती जागा होती. येथील थडगी ते संधी साधून तोडत होते. त्यामध्ये ठेवलेल्या कलाकृती लुटत होते. असे त्यांनी अनेक शतके केले. या थडग्यांमध्ये भांड्यांचे तुकडे आणि काही नाणी मिळाली आहेत. ज्या दुसऱ्या चौथ्या शतकातील आहेत. आतील भिंतीवर केलेली कलाकृती रोमन साम्राज्याची झलक दाखविते.