21 वर्षांच्या मुलीचा असा कारनामा, गिनीज बुकात कोरलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 16:28 IST2019-06-12T16:24:37+5:302019-06-12T16:28:45+5:30

196 देशांना भेट देणारी 21 वर्षांची लेक्सी अलफॉर्ड ही तरुणी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.
तिने आतापर्यंत जगभरातल्या सर्वच देशांना भेटी दिल्या आहेत.
तत्पूर्वी ब्रिटनच्या जेम्स एस्किथ वयाच्या 24व्या वर्षी हा कारनामा केला होता
त्यावेळी तिचं ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव कोरलं गेलं होतं. आता तिची जागा लेक्सीने घेतली आहे.
लेक्सीच्या कुटुंबाची कॅलिफोर्नियात ‘ट्रॅव्हल एजन्सी’ आहे.
त्यामुळे बालपणापासूनच तिच्यात फिरण्याची आवड होती.
मी लहानपणापासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची, त्यावेळी मला एवढी समज नव्हती, पण तेव्हापासून माझ्यात प्रवास करण्याची आवड वाढत गेली.