शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Virali Modi: डॉक्टरांनी मृत घोषित केलं, २३ दिवस कोमात राहिली; वडिलांच्या स्पर्शाने मुलगी पुन्हा जिवंत झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 12:19 PM

1 / 10
तुम्ही हिंदी सिनेमा अथवा एखाद्या पुस्तकात वाचलं असेल मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. परंतु मी दोनदा मृत झाली तरी आज जिवंत आहे. विश्वास बसत नाही ना. परंतु हे सत्य आहे. हे बोल आहेत मॉडेल, मोटिवेशनल स्पीकर विराली मोदी(Virali Modi) हिचे. ती सध्या व्हिलचेअरवर असते.
2 / 10
मुंबई जन्मलेल्या विरालीची देखभाल अमेरिकेत झाली आहे. १४ वर्षापर्यंत तिचं आयुष्य सर्वसामान्य होतं. इतर मुलींप्रमाणे विरालीला शिक्षणाची, डान्स, मॉडेलिंगची हौस होती. २००६ मध्ये मुंबईत नातेवाईकांच्या भेटीला आली होती. परंतु परत अमेरिकेत जाताना तिला अचानक १०२-१०३ ताप आला.
3 / 10
विराली डॉक्टरांकडे गेली असता तिला हवामान बदलल्यामुळे ताप आल्याचं सांगितले. क्रोसिन घेतल्यानंतर सर्व ठीक झाले. त्यानंतर पुन्हा ताप येत जात असे. एकेदिवशी अचानक अतिताप आल्यानं मला इमरजेन्सीमध्ये आईवडील डॉक्टरांकडे घेऊन गेले त्याठिकाणी मलेरिया चाचणी केली परंतु सगळं नॉर्मल होतं.
4 / 10
MRI, ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट सगळं केलं इतकंच नाही तर पाठिच्या कण्यात इंजेक्शन टाकून पाणी काढलं. परंतु कुठल्याही रिपोर्टमध्ये काहीच काळजी करण्यासारखं नव्हतं. त्यानंतर रात्री मी घरी आले तेव्हा पुन्हा ताप चढला. मला उभं राहता येत नव्हतं. स्पाइनमध्ये समस्या असावी असं डॉक्टर म्हणाले पण त्याचीही खात्री नव्हती.
5 / 10
उलट्या झाल्याने माझ्या लंग्समध्ये इंफेक्शन झालं होतं. श्वास थांबला, ह्दयाचे ठोके बंद पडले आणि ७ मिनिटांत मला डॉक्टरांनी मृत घोषित केले. परंतु कुटुंबाच्या सांगण्यावरुन डॉक्टरांनी पुन्हा अथक प्रयत्न केले परंतु काहीच झालं नाही. मला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर २३ दिवस मी कोमामध्ये होती.
6 / 10
२१ सप्टेंबर २००६ रोजी डॉक्टरांनी आई वडिलांना सांगितले तुमची मुलगी वाचणार नाही. आम्ही तिचं व्हेंटिलेटर काढून टाकतो. परंतु २९ सप्टेंबरला मुलीचा १५ वा वाढदिवस आहे तोपर्यंत व्हेटिंलेटर तसेच ठेवण्याची विनंती घरच्यांनी केली. हॉस्पिटलने अट घातली की २९ सप्टेंबरपर्यंत कोमातून बाहेर आली नाही तर प्लग काढला जाईल.
7 / 10
२९ सप्टेंबरच्या वाढदिवसाच्या दिवशी माझं सर्व कुटुंब आलं. त्यावेळी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माझे वडील माझ्याकडे आले आणि त्यांना माझा हात पकडला. वडिलांच्या त्या स्पर्शाने माझे डोळे उघडले. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ३०-३५ मिनिटांनी मी पुन्हा कोमात गेले. परंतु यावेळी डॉक्टरांनी प्रयत्न सुरूच ठेवले.
8 / 10
काही दिवसांनी मला जाग आली. मी कोमातून बाहेर आली परंतु मला गळ्याखालील भागात पॅरालिसिस झाला होता. मला हॉस्पिटलमधून व्हिलचेअरवर आणण्यात आलं. मी शरीराची हालचाल करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु काहीच होत नव्हतं. मानसिक तणावाखाली मी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु तेदेखील शक्य झालं नाही.
9 / 10
तेव्हा आईने माझ्याशी संवाद साधला, ती म्हणाली. जे तुझ्यासोबत झाले हा तुझा भूतकाळ आहे. परंतु तू स्वत:चं भविष्य खराब करू नको. तू सेल्फ लीव शिकून घे. हा शब्द मला माहिती नव्हता. आईनं मला आधार दिला. त्यानंतर मी मोटिवेशनल पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली. मेडिटेशन केले. फिजियोथेरपीने हॉर्बिज डिस्कवर केले.
10 / 10
२०१४ मध्ये मिस व्हिलचेअर इंडिया स्पर्धेत मी भाग घेतला. त्यात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाने मी ग्लॅमर इंडस्ट्रीत प्रवेश केला. मला मार्ग मिळाला पण संधी नाही. मी डिसएबिलिटी हक्कांसाठी लढत राहिली. २०१८ मध्ये मी मोटिवेशनल स्पीकर बनली. सलमान खानसोबत बीईंग ह्युमनची मॉडेल म्हणून काम केले. आर्ट गॅलरीत माझे फोटो झळकले. आता कोविडमुळे कामावर परिणाम झाला. परंतु माझं लिखाण सुरू आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी