शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 12:12 PM

1 / 6
अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी पेनल्टी शूटआऊटदरम्यान गोलरक्षक सविताने अडवलेला गोल निर्णायक ठरला आणि भारताने चीनविरुद्ध ५-४ अशी बाजी मारत दिमाखात महिला आशिया चषक उंचावला.
2 / 6
विशेष म्हणजे या जेतेपदासह भारताच्या महिलांनी पुढील वर्षी होणा-या विश्वचषक स्पर्धेसाठीही थेट प्रवेश केला.
3 / 6
संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा राखलेल्या भारतीय महिलांनी तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक उंचावण्याची कामगिरी केली.
4 / 6
सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम लढतीत दोन्ही संघांच्या महिलांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक चाली रचल्या. २५ व्या मिनिटाला नवज्योत कौर हिने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने १-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारतीय महिलांनी ४७ व्या मिनिटापर्यंत टिकवली. पण ४७ व्या मिनिटाला टियांटन लुका हिने गोल करत चीनला १-१ गोलबरोबरी साधून दिली.
5 / 6
त्यानंतर निर्धारित वेळेत हीच बरोबरी कायम राहिल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लावण्यात आला. शूटआऊटमध्ये भारतीय संघाने ५-४ गोलने बाजी मारली.
6 / 6
भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यांत विजय मिळवला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्य फेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. भारताने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०, चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते. भारतीय संघ याआधी २००९ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते.
टॅग्स :Hockeyहॉकी