शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ औषधच नाही तर या 5 घरगुती उपायांनीही बरं होतं किडनी इन्फेक्शन, दुसरा उपाय पूर्णपणे फ्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 4:44 PM

1 / 6
Home remedies for kidney infection : किडनी इंफेक्शन (kidney infection) तेव्हा सुरू होतं जेव्हा बॅक्टेरिया तुमच्या किडनीमध्ये शिरतात आणि मूत्रमार्गात व ब्लॅडरपर्यंत पसरतात. तसं तर किडनी इन्फेक्शनला सहजपणे ठीक करता येतं. पण काही केसेसमध्ये गंभीर समस्या निर्माण होतात. खासकरून तेव्हा जेव्हा उपचार न करता त्याकडे दुर्लक्ष करणं. किडनी इन्फेक्शन एका किडनीतून दुसऱ्यात पसरू शकतं. इतकंच नाही तर किडनी इन्फेक्शन तुमच्यासाठी डोकेदुखीचं ठरू शकतं. अशात तुमच्याकडे काही नैसर्गिक उपाय आहेत जे याच्या लक्षणांपासून आराम देतं. पण त्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊ किडनी इन्फेक्शनच्या उपचारात कामी येणारे काही नैसर्गिक उपाय..
2 / 6
1-क्रेनबेरी ज्यूस - क्रेनबेरी ज्यूसचा वापर अनेक वर्षांपासून यूटीआय आणि ब्लॅडर इन्फेक्शनच्या उपचारात केला जातो. काही केसेसमध्ये याचा वापर किडनी इन्फेक्शनमध्येही केला जातो. काही लोक हा ज्यूस पाणी टाकूनही पिऊ शकतात. जर तुम्ही हा ज्यूस घेत असाल तर कमी प्रमाणातच करा, कारण या स्वीटनर टाकलं जातं. क्रेनबेरी ज्यूसने किडनी इन्फेक्शनमध्ये आराम मिळतो.
3 / 6
2- पाणी प्या - किडनी इन्फेक्शन रूग्णाने त्याच्या किडनीतून सर्व प्रकारचे बॅक्टेरिया बाहेर काढणं गरजेचं असतं. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी पिऊन शरीरातून इन्फेक्शन बाहेर काढता येतं. जर व्यक्तीची किडनी फेल असेल तर त्या व्यक्तीला पाण्याचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला जातो. पाणी पिणं सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. जे विना अॅंटीबायोटिक इन्फेक्शनपासून बचाव करतं.
4 / 6
3-पार्सले ज्यूस - क्रेनबेरी ज्यूसप्रमाणेच पार्सले ज्यूसही किडनी इन्फेक्शनवर उपचारात प्रभावी ठरतं. या ज्यूसमध्ये असे पोषक तत्व असतात जे लघवीचं प्रमाण आणि पुन्हा पुन्हा लघवीला जाण्यास भाग पाडतं. याने केवळ तुमच्या किडनीतील बॅक्टेरियाच बाहेर येणार नाही तर अॅंटीबायोटिकला आपलं काम करण्यास गतीही देतं.
5 / 6
4-प्रोबायोटिक - जेव्हाही विषय किडनी इन्फेक्शन झालं तर प्रोबायोटिक अनेक प्रकारे फायदेशीर असतात. प्रोबायोटिक हेल्दी बॅक्टेरियांना शरीरात कायम ठेवतात. इतकंच नाही तर प्रोबायोटिक पोटदुखीच्या रूग्णांनाही फायदा देतात. इतकंच नाही तर प्रोबायोटिक किडनीचं कार्य चांगलं करण्यातही फायदेशीर असतात आणि दुसरं इन्फेक्शनही रोखतात.
6 / 6
5-लसूण - किडनी चांगली ठेवण्यासाठी लसूण सर्वात बेस्ट घरगुती उपायांपैकी एक आहे. हा मीठ आणि दुसरे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढतो. लसणात मूत्रवर्धक गुण असतात, जे किडनी रोगांना रोखण्याच्या कामात येतात. किडनी इन्फेक्शन रोखण्यासाठी तुम्ही लसणाचा डाएटमध्ये समावेश करा. दिवसातून 2 ते 3 लसणाच्या कळ्या सुरक्षित मानल्या जातात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य