Corona Vaccination Child: कोरोना लसीचे लहान मुलांवर साईड इफेक्ट कोणते? काळजी घ्या, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:07 PM2021-10-21T20:07:10+5:302021-10-21T20:14:01+5:30

Corona Vaccine Side effects on Child: लसीचा पुरवठा नियमित व्हावा, टंचाई जाणवू नये म्हणून दोन ते तीन9 वयोगटांमध्ये हे लसीकरण विभागले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी लहान मुलांवर कोरोना लसीचे कोणते साईड इफेक्ट होऊ शकतात, असा प्रश्न अनेक पालकांच्या मनात येणार आहे.

कोरोना व्हायरसने (corona Vaccine) अवघ्या जगाला त्रस्त केले आहे. कोणी बाप, कोणी आई तर कोणी पती तर कोणी पत्नी, भाऊ, बहीण गमावले आहेत. भारतात देखील कोरोनाने खूप कहर माजविला आहे. यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. (corona Vaccine children side effects)

कोरोनाचे नवनवीन व्हेरिअंट मुलांना संक्रमित करत असल्याचे सांगितले जात होते. काही अंशी हे खरेदेखील होते. यामुळे या नव्या व्हेरिअंटपासून मुलांना वाचविण्यासाठी केंद्र सरकारने मुलांना लस देण्याची तयारी सुरु केली आहे. पुढील महिन्यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस येणार आहे. यामुळे आता भारतात 2 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण होणार आहे.

लसीचा पुरवठा नियमित व्हावा, टंचाई जाणवू नये म्हणून दोन ते तीन9 वयोगटांमध्ये हे लसीकरण विभागले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी लहान मुलांवर कोरोना लसीचे कोणते साईड इफेक्ट होऊ शकतात, असा प्रश्न अनेक पालकांच्या मनात येणार आहे. मोठ्या लोकांप्रमाणेच लहान मुलांनाही साईड इफेक्ट जाणवणार का, तर वैद्यकीय तज्ज्ञांचे उत्तर हो असे आहे.

मुलांवर कोरोना लसीची चाचणी घेतल्यानंतर काही सामान्य लक्षण दिसली आहेत. यामध्ये फ्ल्यू सारखी लक्षणे आहेत, जी अपेक्षित आहेत. हे लक्षण कोरोना लसीचा परिणाम मानले जातात. कोरोना लस घेतल्यानंतर जर मुलांमध्ये ही लक्षणे दिसली तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क करावा, तुमच्या मर्जीने मुलांना कोणतीही लस देऊ नये.

कोरोना लस जेव्हा शरीरावर परिणाम करू लागते तेव्हा अन्य काही साईड इफेक्टही दिसतात. यामध्ये अंगदुखी, थकव्यासारखी लक्षणे आहेत. मात्र, मूल 2 वर्षे ते 5 वर्षांचे असेल तर त्याला ते नीट सांगता येणार नाही. यामुळे आपल्याला घाबरायचे नाहीय असे पानीपतचे डॉक्टर फिजिशिअन डॉ. परवेश मलिक यांनी सांगितले आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे घेऊन आराम करावा, ही लक्षणे 2 ते 3 दिवसांत दूर होतील असे ते म्हणाले.

कोरोना लस घेतल्यावर जसा मोठ्या लोकांना ताप आला तसाच ताप लहान मुलांना येऊ शकतो. लस आपला परिणाम दाखविते. अशावेळी डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

लहान मुलांना ज्या ठिकाणी इंजेक्शन टोचले जाईल त्या ठिकाणी वेदना होऊ शकतात. अशाच वेदना मोठ्यांमध्ये जाणवत होत्या. यामुळे मुलांकडून तुम्हाला जास्तीचा आराम करून घेणे गरजेचे आहे. काही दिवसांनी हे दुखणे बंद होईल.

Read in English