उन्हाळ्यात घामामुळे शरीराची लाही लाही होतेय? या उपाय कराल तर वाटेल ठंडा ठंडा कूल कूल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:16 PM2024-04-01T12:16:19+5:302024-04-01T12:48:53+5:30

अनेक उपाय करूनही तुम्हाला गरम होत असेल तर शरीरातून उष्णता बाहेर काढण्याचे काही खास उपाय आम्ही सांगणार आहोत.

उन्हाळयात जास्तीत जास्त लोक शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त थंड पाणी पितात तर काही लोक दिवसातून तीन वेळा थंड पाण्याने आंघोळ करतात. पण इतकं करूनही तुम्हाला गरम होत असेल तर शरीरातून उष्णता बाहेर काढण्याचे काही खास उपाय आम्ही सांगणार आहोत.

तळलेले पदार्थ कमी खावे - उन्हाळ्यात तळलेले किंवा भाजलेले पदार्थ कमी खावेत. जंक फूड किंवा तळलेले पदार्थ अधिक खाल्ल्याने शरीराचं तापमान वाढतं आणि तुम्हाला जास्त गरम होऊ लागतं. त्यामुळे असे पदार्थ टाळावे. उन्हाळ्यात शाकाहारी आहार तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करू शकतो.

डाळिंबाचा रस - उन्हाळ्यात डाळिंबाचा रस तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतो. फक्त तुम्हाला इतकंच करावं लागेल की, डाळिंबाच्या रसात बदामाच्या तेलाचे काही थेंब टाकून सेवन करा. याने शरीरातील उष्णता दूर होईल.

पाय पाण्यात ठेवा - उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणं सगळ्यांनाच आवडतं. पण पुन्हा पुन्हा थंड पाण्याने आंघोळ कराल तर तुम्हाला सर्दी होऊ शकते. त्यामुळे शरीरातील उष्णता काढण्यासाठी तुम्ही थंड पाण्यात 10 मिनिटे पाय ठेवून बसा. याने उष्णता दूर होईल.

खसखस देईल आराम - झोपण्याआधी थोडं खसखस सेवन केल्याने शरीरातील उष्णात दूर होऊ शकते. खसखसचं सेवन तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. पण याचं जास्त प्रमाणातही सेवन करू नये.

थंड दूध घ्या - उन्हाळ्यात अनेकांना दूध पिणं आवडत नाही. पण यात थोड मध घालून सेवन केल्यास शरीरातील उष्णता दूर होऊ शकते.

चंदनाचा लेप - शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही चंदनाचा लेप लावू शकता. तुम्हाला जास्त गरम होत असेल तर चंदनाचा लेप पायांवर आणि कपाळावर लावा. याने तुम्हाला थंडावा वाटेल.

व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ - उन्हाळ्यात थंड वाटावं म्हणून तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचं सेवन करा. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी युक्त भाज्या, फळं शरीरातील तापमान कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे लिंबू, संत्री, मोसंबीचं सेवन करा.

छासचं सेवन करा - उन्हाळ्यात छासचं सेवन केल्याने फायदा होतो. याने पोट चांगलं राहतं. याने शरीरातील उष्णता दूर होते.