कोलेस्ट्रॉल वाढले तर हार्ट अटॅक; कमी झाले तर काय? साईड ईफेक्ट माहितीएत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 17:12 IST2024-01-07T17:10:09+5:302024-01-07T17:12:36+5:30
ज्यांची कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी आहे त्यांना काय त्रास होत असेल?

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी, आपल्याला कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कमी करण्यासाठी, आपल्याला कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
हे आहे कोलेस्ट्रॉलची लेव्हल जास्त असणाऱ्यांसाठी. परंतु, ज्यांची कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी आहे त्यांना काय त्रास होत असेल?
कोलेस्ट्रॉल ठराविक पातळीपेक्षा कमी किंवा अधिक असून चालत नाही. एलडीएल कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. परंतु, ते पातळीपेक्षा कमी केले तरी धोकादायक ठरू शकते.
कोलेस्टेरॉलची पातळी खूप कमी होते, तेव्हा यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
मेंदूचे कार्य बिघडणे, स्नायू कमकुवत होणे, मूडचे विकार आणि नैराश्य आणि कर्करोगासह काही रोगांचा धोका देखील वाढू शकतो.
कोलेस्टेरॉलच्या पातळीमध्ये योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. कोलेस्टेरॉलची पातळी 120 मिलीग्राम प्रति डेसीलिटरपेक्षा कमी नसावी.
160 ते 190 मिलीग्राम प्रति डेसीलिटर एवढे प्रमाण योग्य आहे. तर खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL ची पातळी 80 ते 90 mg प्रति डेसीलिटर असावे.