Cancer: ना केमोथेरपी, ना सर्जरी, तरी कॅन्सरवर केली मात; प्रेरणादायी आहे 'या' युवकाची कहाणी!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 27, 2021 10:13 PM2021-02-27T22:13:24+5:302021-02-27T22:20:40+5:30

'कॅन्सरपासून (Cancer) वाचण्यासाठी सर्वप्रथम या आजाराचे मूळ कारण शोधणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशनच्या माध्यमाने कॅन्सरवर उपचार केले जातात. मात्र, अशा प्रकारच्या उपचारांच्या काही त्रुटीही आहेत.' (Sharan India founder Dr Nandita Shah says Cancer disease can naturally control as chris wark did)

कॅन्सर (Cancer) एक अत्यंत घातक आजार. हा आजार झाल्याचे समजताच लोकांच्या पायाखालची माती सरकते. यासंदर्भात बोलताना 'शरण इंडिया'च्या संस्थापक डॉ. नंदिता शाह सांगतात, की कॅन्सरला घाबरण्याऐवजी त्याच्या प्रतिबंधासंदर्भात आणि उपचारांसंदर्भात जागरूक असणे अधिक आवश्यक आहे. एक्सपर्ट सांगतात, की एखादी व्यक्ती हा आजार नैसर्गिकरित्याही कंट्रोलमध्ये आणू शकते.

डॉ. नंदिता शाह (Dr Nandita Shah) यांनी फिट तक वाहिनीशी बोलताना सांगितले, की 'कॅन्सरपासून वाचण्यासाठी सर्वप्रथम या आजाराचे मूळ कारण शोधणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशनच्या माध्यमाने कॅन्सरवर उपचार केले जातात. मात्र, अशा प्रकारच्या उपचारांच्या काही त्रुटीही आहेत.'

डॉ. शाह सांगतात, सर्जरी कॅन्सर मुळासकट नष्ट करण्यास सक्षम नाही आणि माणसाला पुन्हा कॅन्सर होऊ शकतो. याच प्रकारे केमोथेरपीदेखील एक प्रकारचे विषच आहे. अनेक केमोथेरप्यूटिक एजंट्स कार्सिनोजन्स असतात. तरीही डॉक्टर याचा उचारांत वापर करतात.

डॉ. शाह यांनी सांगितले, की कॅन्सर सेल्स अत्यंत वेगाने विकसित होतात आणि केमोथेरपी या सेल्स वेगाने नष्ट करण्याचे काम करतात. मात्र, केमोथेरपीनंतर व्यक्तीचे ब्लड काउंट कमी होते. शरीराच्या अनेक भागांवरील केस गळतात. भूख लागत नाही. पचनसंस्था बिघडते. कारण केमोथेरप्यूटिक एजंट्स आतड्यांतील माइक्रोबायल फ्लॉरा नष्ट करते.

एक केमोथेरपी रुग्णाला दहा अंटीबायोटिक्स एकाच वेळी देण्या एवढे घातक आहे. याच प्रमाणे कॅन्सरमध्ये रेडिएशनने उपचार करणेही घातक ठरू शकते. एक्सपर्ट सांगतात की हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनदेखील कॅन्सरचे कारण ठरू शकते.

डॉ. नंदिता शाह सांगतात, या प्रकारचे उपचार पूर्णपणे अव्हाइड करणे शक्य नाही. पण, ते मिनिमाईज करणे आवश्यक आहे. यासाठी ज्यांनी या आजारावर मात केली, अशा काही कॅन्सर सर्व्हायव्हर्सचा अभ्यास करायला हवा. डॉ. नंदिता शाह यांनी यासंदर्भात 'क्रिस बीट कॅन्सर'चे लेखक क्रिस वॉर्क यांचा उल्लेख केला आहे.

क्रिस वॉर्क यांना कोलोरेक्टल कॅन्सर झाला होता. ते तरुण होते. नवे-नवेच लग्न झाले होते. मेडिकल ट्रिटमेन्टच्या सहाय्याने या आजारावर उचपार करण्याची क्रिस यांची इच्छा नव्हती. यामुळे त्यांनी कॅन्सरवर मात करण्यासाठी एक वेगळीच पद्धत निवडली. जगातील अनेक लोक असे करतात.

क्रिस यांनी आपल्या डायटमध्ये ताज्या भाज्या आणि फळांचे सेवन करायला सुरुवात केली. त्यांनी कच्च्या भाज्या खायला सुरुवात केली. मानवाशिवाय जगातील सर्वच प्रजाती फळे आणि भाज्या कच्च्याच खातात.

याशिवाय क्रिस यांनी रिफायनरी प्रोडक्ट्सचा वापर पूर्णपणे बंद केला. साखर, मैदा, पांढरा तांदूळ आणि विविध प्रकारचे रिफायनरी तेलं त्यांनी बंद केले. एवढेच नाही, तर त्यांनी अॅनिमल प्रोडक्ट्सदेखील पूर्णपणे बंद केले होते.

क्रिस यांच्या लाइफस्टाइलमध्ये अचानक बदल झाला होता. ते हळूहळू आपले लक्ष्य निर्धारित करत होते. कॅन्सरचा सामना करत त्यांनी आपले अनुभव लिहायलाही सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कॅन्सरवर पूर्ण कहाणीच लिहिली. क्रिस आज पूर्णपणे ठणठणीत आहेत. त्यांना दोन मुलीही आहेत.

डॉ. शाह सांगतात, की क्रिस यांच्या रिकव्हरीमागे त्यांचा दृढ निश्चय होता. त्यांच्या या निश्चयाने त्यांना कॅन्सरसमोर कधीच गुडघे टेकू दिले नाही. सर्वसाधारणपणे एखाद्याला कॅन्सर झाला, की मनात विचार योतो, हे माझ्याबरोबरच का? मात्र, अशा आजारात लोकांनी स्टेट ऑफ माइंड चेन्ज करणे गरजेचे असते. या काळात आराम, तणाव, व्यायाम, खाण-पाण आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करून हा आजार वाढण्यापासून रोखला जाऊ शकतो.