शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसांच्या कॅन्सरचा मोठा धोका; 50% रुग्ण करत नाही स्मोकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 2:00 PM

1 / 8
फुफ्फसांच्या कॅन्सर हा नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीमध्ये पहिल्या नंबरवर आहे. म्हणजेच सर्वात जास्त केसेस या फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या असतात. मेदांता रुग्णालयाने या आजाराबाबत रिसर्च केला आहे. फुप्फुसाच्या कॅन्सरचे 50 टक्के रुग्ण धूम्रपान न करणारे असून त्यापैकी 70 टक्के रुग्ण हे 50 वर्षांखालील आहेत, असं या रिसर्चमध्ये आढळले आहे.
2 / 8
फुफ्फुसाच्या कॅन्सरचे 30 वर्षांखालील सर्व रुग्ण हेही स्मोकिंग न करणारे होते. या कॅन्सरमुळेही महिलाही अधिक प्रभावित होत आहेत. तरुणांमध्ये स्क्कॅमस कार्सिनोमाच्या तुलनेत एडेनोकार्सिनोमा या अधिक घातक असलेल्या कॅन्सरच्या अनेक केसेस दिसून आल्या आहेत.
3 / 8
मेदांताच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट ऑन्को सर्जरी अँड लंग ट्रान्सप्लांटेशन’ चे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांच्या नेतृत्वाखालील टीमने मार्च 2012 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत उपचार घेणाऱ्या रुग्णांचा शोध घेतला. या काळात आऊट पेशेंट क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.
4 / 8
फुफ्फुसाच्या विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांमध्ये 30 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे यामध्ये आढळून आले. 304 रुग्णांवर करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये असे दिसून आले की धूम्रपान न करणारे लोकही मोठ्या संख्येने फुफ्फुसांच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत.
5 / 8
डॉ. कुमार यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये बहुतांश प्रकरणात फुफ्फुसाचा कॅन्सर 60 वर्षांवरील लोकांमध्ये असल्याची नोंद आढळते. मात्र भारतात फुफ्फुसाच्या कॅन्सरचे रुग्ण 2 दशकांपूर्वी म्हणजे आढळून आला होता, हे जाणून मी जास्त हैराण झालो, असं म्हटलं आहे.
6 / 8
फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे 10 टक्के रुग्णांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. मी विविध ओपीडीमधील माहिती तपासली असून त्यामध्ये असे आढळले की, धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणाऱ्या लोकांमधील फुफ्फुसाचा कॅन्सर हा जवळपास सारखाच आहे, याचा सर्वात जास्त परिणाम तरुण स्त्रियांवर होतो.
7 / 8
फुफ्फुसाच्या बाह्यभागावर अस्तर असलेल्या कोशिका कॅन्सर होतात तेव्हा एडेनोकार्सिनोमा तयार होतो. तर, ज्या कोशिका वायूमार्गाच्या जागेवर परिणाम करतात त्या कोशिकांना स्क्वॅमस कार्सिनोमा प्रभावित करतात. कॅन्सरचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला होतेय, ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे, असं डॉ. कुमार यांनी सांगितलं.
8 / 8
अशा रुग्णांवर उपचार करणे हे एक आव्हान असते. मात्र सध्याच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, या टप्प्यांवरील तरुण रुग्ण त्यांची 85 टक्के कामे शारीरिकरित्या करण्यास सक्षम असतात. यामध्ये अशा अनेक केसेस आढळल्या जिथे रोगाचे योग्य निदान झाले नाही. तर काही रुग्णांवर टीबीचे उपचार सुरू होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सSmokingधूम्रपान