Health Tips: दिवसा किती खाव्यात चपाती आणि रात्री किती खाणं योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 03:16 PM2023-04-24T15:16:50+5:302023-04-24T15:32:49+5:30

How many chapatis should eat daily: शरीर फीट ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी दिवसातून किती चपात्या खायला हव्या? जर नसेल माहीत तर चला जाणून घेऊ चपातीबाबत काही महत्वाच्या बाबी...

How many chapatis should eat daily: चपाती आपल्या रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग आहे. चपातीशिवाय भारतीय जेवण अधुरं आहे. देशातील जास्तीत जास्त भागांमध्ये दोन्ही वेळच्या जेवणात चपाती खाल्ली जाते. चपातीबाबत म्हटलं जातं की, याने वजन वाढत नाही. पण काय तुम्हाला माहीत आहे का की, शरीर फीट ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी दिवसातून किती चपात्या खायला हव्या? जर नसेल माहीत तर चला जाणून घेऊ चपातीबाबत काही महत्वाच्या बाबी...

बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की, भाताच्या तुलनेत चपाती फायदेशीर आहे. चपाती खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. त्यामुळे बरेच लोक लंच किंवा डिनरमध्ये न मोजता चपात्या खातात. पण एक्सपर्ट्सनुसार, असं करणं बरोबर नाही. आधी घरातील वृद्ध लोक म्हणायचे की, कधीच मोजून मापून खाऊ नये. असं केल्याने अन्न शरीराला लागत नाही.

पण तो काळ असा होता जेव्हा पदार्थ, पाणी, हवाही प्रदूषित नव्हती. अन्नधान्य, भाजीपाल्यात केमिकल्सचा वापर अजिबात होत नव्हता. ऑर्गेनिक पद्धतीने धान्य, भाज्या उगवल्या जात होत्या. पण आता केमिकलचा वापर वाढला आहे. अशात जर आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिलं नाही तर समस्या होऊ शकते.

एक्सपर्ट्सनुसार पुरूष आणि महिलांसाठी चपाती खाण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. पोट भरण्यासाठी न मोजता चपात्या खाणं योग्य नाही. अशात ज्या महिलांना दिवसातून 1400 कॅलरींची गरज असते त्यांनी 2 चपात्या सकाळी आणि 2 सायंकाळी खाऊ शकतात. जर एखाद्या पुरूषांचा डाएट प्लान 1700 कॅलरींचा असेल तर त्यांनी लंच आणि डीनरमध्ये तीन-तीन चपात्या खाव्या.

जेव्हा तुम्ही रात्री चपातीचं सेवन करता तेव्हा त्या पचन्यास बराच वेळ लागतो. असं झाल्यास बॉडीची शुगर लेव्हल वाढते. अशात डीनरला चपाती खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. तेच डीनर तुम्ही कोणत्याही स्थितीत आठ वाजेपर्यंत केलं पाहिजे. जेणेकरून झोपण्याआधी वॉक करून कॅलरी कमी होतील.

शरीरातील फॅट कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट जास्त घेणं टाळलं पाहिजे. अशात जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर भात, बटाटे आणि शुगर टाळली पाहिजे. यांनी शरीरात चरबी वाढते.

जर तुम्ही रात्रीच्या वेळी चपाती खात असाल तर दोन पेक्षा जास्त खाऊ नये. इतकंच नाही तर जेवण झाल्यावर शतपावली नक्की करून या. याने चपाती पचनाला मदत होईल. चपाती एक सिंपल कार्ब आहे ज्याने तुमचं मेटाबॉलिज्म बिघडू शकतं. या कारणाने एक्सपर्ट्स रात्री चपातीऐवजी फायबर असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. जे शरीरासाठी फायदेशीर आणि पचनही लवकर होतात.