शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टेन्शन वाढलं! केस पांढरे होताहेत, खूप गळताहेत?, असू शकतं कोरोना इन्फेक्शन; 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 5:30 PM

1 / 7
कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग बरा झाल्यानंतर बरेच लोक दीर्घकाळ कोविडशी सामना करतात. ज्यामध्ये लोकांच्या श्वसनसंस्थेवर, पचनसंस्थेवर आणि इतर गोष्टींवर परिणाम होत असतो. काही लक्षणे इतकी सामान्य आहेत की प्रत्येकजण त्यांच्याशी लढत आहे.
2 / 7
डोक्यापासून पायापर्यंत, कोरोनाचा शरीराच्या सर्व भागांवर परिणाम होतो. कोविड संसर्गानंतर अनेकांना केस गळतीचा अनुभव आला आहे. इतकेच नाही तर तुमचे केस नुकतेच पांढरे व्हायला लागले असतील तर त्यामागे कोरोना इन्फेक्शन देखील मुख्य कारण असू शकतं.
3 / 7
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केस गळण्यासोबतच लोकांमध्ये केस पांढरे होणे देखील लक्षणांमध्ये दिसून आले आहे. कोरोनामुळे केस पांढरे होतात हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी, साथीच्या रोगामुळे होणारा ताण हे कारण असू शकतं.
4 / 7
कोविडमुळे टक्कल पडणार नाही. पण जर कोरोना संसर्गामुळे केस गळत असतील तर आपल्या खाण्याच्या सवयी सुधारा, ज्यामुळे जास्त केस गळणे टाळता येईल. केस घट्ट बांधू नका, जसे की बन किंवा उंच पोनीटेल, ज्यामुळे केस गळतात आणि तुटतात. तसेच हीट स्टाइलिंग किंवा हार्श प्रोडक्ट वापरू नका.
5 / 7
केस गळणे, पातळ होणे किंवा पांढरे होण्यामागे तणाव आणि नैराश्य ही प्रमुख कारणे आहेत, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, जेणेकरून हा ताण कमी करता येईल. तणाव दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योगा, व्यायाम करा तसेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
6 / 7
केसांचे पांढरे होणे पूर्णपणे टाळणे कठीण आहे. मात्र फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार उपयुक्त ठरू शकतो. पुरेशी विश्रांती घेणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असू शकते, म्हणून रात्रीची झोप नीट घेण्याचा प्रयत्न करा, व्हिटॅमिन-डी आणि आयरनच्या कमतरतेचाही केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
7 / 7
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे केसांशी संबंधित लक्षणांव्यतिरिक्त अनेकही लक्षणं आहेत. यामध्ये सर्दी, खोकला, पोटात दुखणं, भूक न लागणे, घशामध्ये खवखव, श्वास घेण्यास त्रास होणं, वास न येणं, चक्कर येणं, अस्वस्थ वाटणं, डोकेदुखू. झोप न येणे यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स