Corona Virus : कोरोनाचा सुपरस्पीड! ताप-खोकला सोडा, 'ही' 5 गंभीर लक्षणं ठरताहेत घातक; डॉक्टरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:13 PM2022-06-22T15:13:47+5:302022-06-22T15:28:15+5:30

Corona Virus : कोरोनाची लक्षणे आता काही दिवस किंवा आठवड्यात बरी होत नाहीत, तर अनेक महिने किंवा वर्ष ते रुग्णांची पाठ सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

देशात कोरोना व्हायरसचा प्रसार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कोरोनाचा सुपरस्पीड पाहायला मिळत असून नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 12,249 नवीन रुग्ण आढळले आहेत.

वाढत्या रुग्णांकडे कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहिले जात आहे. देशात आतापर्यंत 43,334,657 लोकांना कोरोनाची लागण झाली असून एकूण 524,890 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

कोरोना व्हायरस वारंवार आपलं रूप बदलत असल्याने आणि त्याची लक्षणे देखील बदलत असल्याने, त्याची लक्षणे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरुन त्यावर चांगले उपचार करण्यास मदत होईल.

कोरोनाची लक्षणे आता काही दिवस किंवा आठवड्यात बरी होत नाहीत, तर अनेक महिने किंवा वर्ष ते रुग्णांची पाठ सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. दीर्घकाळ टिकणारी लक्षणे लाँग कोविड म्हणून ओळखली जातात.

तुम्हाला गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा त्रास झाला असेल आणि आता तुम्हाला थकवा, अशक्तपणा किंवा धाप लागणे यासारखी लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही सतर्क राहून ताबडतोब चांगले उपचार करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरोनामध्य़े हा प्रामुख्याने श्वसनमार्गाचा संसर्ग होतो. याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. महामारीच्या सुरुवातीपासून श्वास घेण्यास त्रास होणं हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे. डेल्टा, अल्फा, बीटा, गामा आणि अगदी ओमायक्रॉन सारख्या कोरोनाच्या प्रकारांमध्ये देखील हे लक्षण सामान्य आहे.

लाँग कोविडच्या लक्षणांमध्ये लक्षणे हे लक्षणं पहिल्या स्थानावर आहे. याचा अर्थ असा की बरे झालेल्या रुग्णांना अनेक महिने किंवा वर्षांपर्यंत श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नारायणा हेल्थ सिटी, बंगळुरू येथील कंसल्टेट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ प्रवीण पी सदरमिन यांनी कोरोना शरीराच्या इतर अवयवांवर देखील परिणाम करतो आणि त्याचा हृदयावरही मोठा परिणाम होतो असं म्हटलं आहे.

कोरोना संसर्गानंतर रुग्ण छातीत धडधडणे आणि हृदयाचे ठोके जलद होण्याची तक्रार करतात. वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) ने मान्य केले आहे की कोरोनामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका आहे. यामुळे मायोकार्डिटिस किंवा पेरीकार्डिटिसचा धोका होऊ शकतो.

ब्रेन फॉगची समस्या अनेक कोरोना रुग्णांमध्ये दिसून आली आहे. कोरोना संसर्गानंतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हा मोठा धोका बनला आहे. त्याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, नैराश्य किंवा चिंता इ. ही लक्षणे दीर्घकाळ टिकतात.

डेल्टा व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे लक्षण दिसून आले. तथापि, ओमायक्रॉन प्रकारांच्या बाबतीत फारशी प्रकरणे आढळली नाहीत. कोरोना संसर्गादरम्यान वास न येणं आणि चव न समजणं अशा घटना घडल्या आहेत.

भारतात एकूण रुग्णांची संख्या 4,33,31,645 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 81,687 झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.