Coronavirus: भारताला लवकरच मिळणार कोरोनापासून दिलासा?; वैज्ञानिकांनी सांगितली हीच ‘ती’ वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:07 PM2021-05-08T13:07:03+5:302021-05-08T13:11:03+5:30

Coronavirus: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत चालली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देणाऱ्या एका टीमने मागील महिन्यात सांगितलं होतं की, येणाऱ्या काही दिवसांत भारतात कोरोना व्हायरसचं संक्रमण शिखरावर पोहचणार आहे. परंतु स्थिती बदलली आणि सल्लागार टीमचा हा अंदाच चुकीचा ठरला. पुन्हा एकदा या टीमने अंदाज वर्तवला आहे जो वैज्ञानिकांच्या अंदाजाशी साम्य ठरत आहे. वैज्ञानिकांनी भारतात मे महिन्याच्या पंधरवड्यात कोरोना संक्रमण उच्च शिखर गाठेल त्यानंतर हळूहळू या रुग्णसंख्या कमी होऊ लागेल.

भारतात कोरोना संक्रमणाचे दिवसाला ४ लाखापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी हा आकडा ४ लाख १२ हजार २६२ इतका होता. तर २४ तासांत ३ हजार ९८० लोकांचा मृत्यू झाला. परंतु तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, आकडेवारी कमी करून दाखवली जात आहे. कारण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत आहे त्याचसोबत रुग्णांना बेड्स ऑक्सिजन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या आकड्यावरून सध्याच्या स्थितीचं आकलन करणं कठीण होत आहे.

परंतु अंदाज घेणं महत्त्वाचे आहे. देशात लॉकडाऊन लावण्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅकफूटवर जात आहेत. तर दुसरीकडे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पातळीवर राज्यात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करत आहे.

ब्लूमबर्गने हैदराबादमध्ये आयआयटीचे प्रोफेसर माथुकुमल्ली विद्यासागर यांनी सांगितले की, आमच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत कोरोना शिगेला जाऊ शकतो. कानपूर आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी तयार केलेल्या मॉडेलनुसार प्रोफेसर माथुकुमल्ली विद्यासागर म्हणाले की, सध्याच्या अंदाजाप्रमाणे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दिवसाला २० हजार रुग्ण आढळू शकतात. आपल्याला यावर रिसर्च करावा लागेल

मनिंद्र अग्रवालच्या टीमने चुकीची भविष्यवाणी केली होती की, एप्रिलच्या मध्यपर्यंत कोरोनाची लहर शिगेला पोहचेल परंतु चुकीच्या निकषामुळं हे घडलं.

आता अलीकडेच मनिंद्र अग्रवाल यांनी रॉयटर्सला सांगितले आहे की, कोरोना पीक ३-४ मे दरम्यान असेल. त्यानंतर इंडिया टूडेशी बोलताना ७ मे पर्यंत कोरोना संक्रमण उच्च पातळीवर असेल असं सांगितले आहे.

सध्या अनेक वैज्ञानिकांच्या मते, येणारे काही आठवडे भारतासाठी कठीण आहेत. बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेने एका गणितीय मॉडलवर आधारित काही रिपोर्ट समोर आणले आहेत. यात ११ जूनपर्यंत ४ लाखापर्यंत मृत्यूचा अंदाज वर्तवला आहे. भारतात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या २ लाखापर्यंत पोहचली आहे.

मागील १५ दिवसांत भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला ३ लाखाच्या वर पोहचली आहे. भारतात कोरोना संक्रमणाची संख्या अडीच कोटीपर्यंत पोहचली आहे. काही वैज्ञानिकांच्या मते, भारतात अचानक आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी नवा वेरिएंट जबाबदार आहे.

नोएडाच्या कैलाश हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ अनुराधा मित्तल यांनी लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. परंतु तरीही त्या कोरोना संक्रमित झाल्या आहेत. केवळ त्याच नाहीत तर ५० डॉक्टरांनाही ही समस्या आली आहे. अनुराधा मित्तल यांनी सांगितले की, आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतो त्याठिकाणी वायरल लोड जास्त असून संक्रमण वाढण्यासाठी नवा म्यूटेंट जबाबदार आहे

वैज्ञानिक या गोष्टीने चिंतेत आहेत की, नवा व्हायरल म्यूटेशन पुढील ब्लाइंडस्पॉट बनू शकतात. जसं नवा स्ट्रेन दुसऱ्या देशात पोहचेल तेव्हा महामारी जगात हाहाकार माजवू शकते.

Read in English