शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कोरोना संसर्गाबाबत WHO कडून 'मोठी चूक', वाद पेटल्यावर चूक सुधारली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:09 AM

1 / 9
सोमवारी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या एका एक्सपर्टने सांगितले होते की, कोरोना व्हायरसची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांव्दारे अपवादानेच व्हायरस पसरतो. मात्र, मंगळवारी लगेच WHO ने त्यांचं हे वक्तव्य मागे घेतलंय.
2 / 9
याआधी WHO च्या वक्तव्यावर फार गोंधळ उडाला होता आणि सोशल मीडियावर अनेक प्रसिद्ध लोकांनी सांगितले होते की, आता सर्व प्रकारच्या बंदी उठवली पाहिजे.
3 / 9
WHO हेल्थ इमरजन्सी प्रोग्रामच्या टेक्निकल लीड आणि महामारी रोग विशेषज्ञ डॉ. मारिया वॅन केरखोवे यांनी मंगळवारी म्हटले की, त्यांनी याआधी केलेलं वक्तव्य केवळ 2 ते 3 रिसर्चच्या आधारवर केलं होतं. त्या म्हणाल्या की, जगात कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रूग्णाव्दारे संक्रमण फार कमी पसरतं, हे मान्य करणे चुकीचं ठरेल.
4 / 9
मारिया वॅन असंही म्हणाल्या की, त्या एका प्रश्नाचं उत्तर देत होत्या. त्या WHO च्या कोणत्याही पॉलिसीची घोषणा करत नव्हत्या. याआधी जगभरातील मेडिकल सायंटिस्टने त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली होती. वैज्ञानिक म्हणाले होते की, अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, लक्षणे नसलेल्या लोकांमधूनही व्हायरस पसरतो.
5 / 9
दरम्यान, मारिया म्हणाल्या की, लक्षणे नसलेल्या कोरोना संक्रमितकडून व्हायरस पसरण्याबाबत आमच्याकडे ठोस असं कोणतंही उत्तर नाही. त्या म्हणाल्या की, हे निश्चित आहे की, लक्षणे नसलेल्या रूग्णांव्दारेही व्हायरस पसरतो. पण याची आकडेवारी किती आहे याचं उत्तर नाही. यावर अजून अभ्यास सुरू आहे.
6 / 9
कोरोना व्हायरसच्या विरोधात रिस्पॉन्सबाबत WHO ला आधीत प्रश्न विचारले जात आहेत. अनेक आरोपांनंतर अमेरिकेने WHO चं फंडींग थांबवलं होतं. अशात नवा वाद सुरू होण्याआधीच WHO ने आपली चूक मान्य केली.
7 / 9
अनेक रिसर्चमधून हे समोर आले आहे की, एकूण संक्रमित लोकांपैकी 40 टक्के लोक असे असू शकतात ज्यांना Asymptomatic कडून म्हणजेच कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांकडून लागण झालेली असावी.
8 / 9
अमेरिकेतील सेंटर ऑफ डिजीज कंट्रोल अॅंन्ड प्रीव्हेंशनचा अंदाज आहे की, अशा केसेस 35 टक्के असू शकतात. या थेअरीमुळे जगभरातील लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
9 / 9
दरम्यान, लक्षणे नसलेले कोरोना संक्रमितही दोन प्रकारचे असतात. एक ज्यांमध्ये सुरूवातीला लक्षणे दिसत नाहीत, पण काही दिवासांनी लक्षणे दिसतात. तेच दुसऱ्या प्रकारच्या ते लोक असतात जे पॉझिटिव्ह असतात, पण त्यांच्यात लक्षणे कधीच दिसत नाहीत. मारिया वॅन म्हणाले की, त्यांचं वक्तव्य कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांबाबत होतं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealth Tipsहेल्थ टिप्स