शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus :स्वयंपाकघरातील 'या' चुकांमुळे होऊ शकता कोरोनाचे शिकार, 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 12:12 PM

1 / 10
जगभरासह भारतात सुद्धा कोरोना पसरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. इतकंच नाही तर कोरोनाची लागण होऊन मृत्यू होत असलेल्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.
2 / 10
लॉकडाऊनचं पालन करताना सुद्धा घरच्याघरी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तरंच तुम्ही कोरोनापासून स्वतःला लांब ठेवू शकता.
3 / 10
त्यासाठी जेवण बनवण्याच्या आधी आणि बनवून झाल्यानंतर दोन्हीवेळा हात स्वच्छ धुवा.
4 / 10
एखादी वयस्कर किंवा आजारी व्यक्ती तुमच्या घरी असेल तर त्यांच्या जवळ जाताना हात सॅनिटाईजर करा. शक्यतो लांबून बोलण्याचा प्रयत्न करा.
5 / 10
तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली असल्यास स्पर्श करण्याआधी आणि नंतर हात स्वच्छ धुवा. सर्दी, खोकला झाला असेल तर स्वयंपाक घरात जाताना खबरदारी घ्या.
6 / 10
जेवण बनवत असताना मास्कचा वापर करा. भाज्या फळं, खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ, डाळी स्वच्छ धुवून मगंच पदार्थ तयार करा.
7 / 10
बाहेरून आणलेल्या फळं भाज्या आधी गरम पाण्यात भिजवून ठेवा. भाज्या कापत असताना हातात ग्लॉव्हज घाला किंवा हात स्वच्छ धुवून मगच स्पर्श करा.
8 / 10
जर तुम्ही मासाहाराचं जेवण तयार करत असाल तर आधी मीठाच्या गरम पाण्यात भिजवून मगच तयार करा. कोणत्याही माध्यमातून कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्यामुळे निष्काळजीपणा करणं आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं.
9 / 10
बाजारातून सामान आणल्यानंतर घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा. हात धुण्यासाठी साबणाचा वापर केल्यास उत्तम ठरेल. बाहेरून आल्यानंतर थेट घरातील कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका.
10 / 10
(image credit-The asian telegraph)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस