Coronavirus: अभिमानास्पद! भारतात पहिली कोरोना लस तयार करणाऱ्या शेतकरी पुत्राची यशस्वी गाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:23 AM2020-07-08T11:23:29+5:302020-07-08T11:27:18+5:30

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनावर लस शोधण्याचा सर्वोतोपरी प्रयत्नात वैज्ञानिक गुंतले आहेत. अशातच भारतानेही कोरोना लस शोधण्यासाठी ह्युमन ट्रायल करण्यात येत आहे.

प्रत्येक देश आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहे. अशातच भारतीय शेतकऱ्याचा मुलगाही कोरोना लस बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. कृष्णा एला असं त्याचं नाव आहे.

दिवसरात्र मेहनत घेतल्यानंतर डॉ. कृष्णा यांनी एक छोटी लॅब उघडली. ज्यात अथक परिश्रम घेऊन मोठ्या कंपनीत रूपांतर केले. आता ते कोरोनाशी लढा देण्यासाठी लस बनवण्याचा दावा करीत आहेत.

ही लस १५ ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याच्या मानवी क्लिनिकल चाचणीला देखील केंद्र सरकारनं मंजुरी देण्यात आली आहे. भारतात ही लस हैदराबादमधील भारत भारत बायोटेक कंपनी बनवित आहे.

त्यानंतर हैदराबादमध्ये भारत बायोटेक नावाची एक प्रयोगशाळा स्थापन झाली आणि त्यांनी काम सुरू केले. डॉ. कृष्णा यांना १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २०११ आणि २००८ या वर्षात त्यांना पंतप्रधानांकडून सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण पुरस्कारही देण्यात आला

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने ही लस तयार करण्याच्या प्रयत्नात कंपनी गुंतलेली आहे.

ही फर्म कोरोना नंतरच लाईमलाइटमध्ये आली असं नाही. यापूर्वी या कंपनीने जगातील सर्वात स्वस्त हेपेटायटीस लस तयार केली होती. जगातील झिका विषाणूची पहिली लस शोधणारी ही पहिली कंपनी होती.

ही कंपनी सुरू करणारे डॉ. कृष्णा एला यांचा जन्म तमिळनाडूच्या थिरुथानी येथे झाला. ते मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबातील ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी कृषीच्या माध्यमातून जैव तंत्रज्ञानाच्या जगात प्रवेश केला. एका मुलाखतीत त्यांनी या प्रवासाबद्दल सांगितले.

त्यांनी प्रथम शेतीचा अभ्यास केला. सुरुवातीला शेती करण्याची योजना होती. आर्थिक दबाव होता. त्यामुळे त्यांनी बायर या केमिकल आणि फार्मास्यूटिकल्स कंपनीत फेलोशिप घेत पुढील शिक्षण केले. त्यानंतर त्याला हंगर फेलोशिपसाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेत गेले.

त्यानंतर डॉ. कृष्णा यांनी हवाई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातून पीएचडी केली. ते अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करीत होते. पण, त्याच्या आईने त्यांनी भारतात यावे अशी इच्छा होती. ते त्यांच्या आईसाठी परतले. त्यानंतर त्यांनी परवडणारी हेपेटायटीस लस तयार करण्याचे काम केले.

Read in English