CoronaVirus Prevention : कोरोना संक्रमणाचा धोका ३१ टक्क्यांनी कमी करणार हा सोपा उपाय; संशोधनातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:04 IST
1 / 9कोरोना व्हायरसच्या माहामारीत प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. कारण फक्त वृद्धांनाच नाही तर लहान मुलांपासून तरूणांनाही कोरोना व्हायरस आपल्या जाळ्यात अडकवत आहे. अशा स्थितीत तुमची एक सवय कोरोना व्हायरसपासून ३१ टक्के सुरक्षा देऊ शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हा बचावाचा उपाय समोर आला आहे. 2 / 9व्यायाम केल्यानं शरीर चांगलं राहतं. हे तुम्हाला माहित असलेचं पण या अभ्यासात व्यायामाची सवय आणि कोरोना व्हायरस यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यात आला आहे. कोरोनाशी लढण्यात व्यायाम खूप परिणामकारक ठरतो. हा अभ्यास स्कॉटलँड्च्या ग्लासगो कॅलेडोनियन यूनिवर्सिटीतील संशोधकांनी केला आहे.3 / 9या अभ्यासात वॉकिंग, रनिंग, सायकलिंग आणि मासपेशींना मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या व्यायाम पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 4 / 9या प्रकारच्या व्यायामामुळे लसीची क्षमताही ४० टक्क्यांनी वाढू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रोज व्यायाम केल्यानं कोविड १९ सारख्या गंभीर आजाराचा धोका ३१ टक्क्यांनी तर मृत्यूचा धोका ३७ टक्क्यांनी कमी होतो. 5 / 9ग्लासगो कॅलेडोनियन यूनिवर्सिटीच्या प्रोफेसर सेबस्टियन चॅस्टिन यांनी सांगितले की, ''फिजिकल एक्टिव्हिटी इम्यून सिस्टीमला सुरक्षा प्रदान करते, त्यामुळे इम्यून सेल्ससुद्धा मजबूत होतात. 6 / 9रोजच्या फिजिकल एक्टिव्हिटीजमुळे कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते. व्यायाम केल्यानं तुम्ही शारीरिक, मानसिक स्वरूपात निरोगी आणि चांगले राहता.''7 / 9या व्यायाम प्रकारात तुम्हाला श्वसन यंत्रणेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. सगळ्यात आधी ४ सेकंदापर्यंत श्वास रोखून धरा. जेणेकरून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल. मग ४ सेकंदांनी श्वास सोडून द्या. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो.8 / 9हा व्यायाम केल्याने शरीरातीतून घाम बाहेर पडतो शिवाय हृदयाचे ठोके नियमित होण्यास मदत होते. कार्डियो एक्सरसाईज फुफ्फुसांसाठी देखील फायदेशीर असतं. यात साधेसोपे व्यामाम प्रकार असतात. चालणे, एकाच जागी उभं राहून उड्या मारणे, जंपिंग जॅक, चालणे, सायकलिंगचा यात समावेश असतो. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.9 / 9याशिवाय आहारही चांगला घ्यायला हवा जेणेकरून फुफ्फुसांना पोषण मिळेल, मादक पदार्थाचं सेवन करू नका. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला आजाराचं शिकार व्हायला लागू शकतं. त्यामुळे संतुलित आहार घ्या. व्हिटामीन सी असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करा.