भयंकर! आठवड्याभरातच मृत्यूला बळी पडत आहेत; 'ही' समस्या असलेले कोरोना रुग्ण,तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 01:24 PM2020-06-02T13:24:26+5:302020-06-02T13:43:01+5:30

कोरोनाची माहामारी जगभरात झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी आणि लोकांचा बचाव करण्यासाठी लस किंवा औषधं शोधण्याचा प्रयत्न सर्वच देशातील शास्त्रज्ञ करत आहेत. सध्या फ्रान्समध्ये झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलं की, कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या रुग्णांमध्ये अशा रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे. ज्यांना आधीपासूनच डायबिटीसची समस्या आहे.

या रिसर्चमध्ये दिसून आलं की, ज्या डायबिटीसच्या रुग्णांना कोरोनाचं संक्रमण झालं त्यातील १० रुग्णांपैकी एका रुग्णांचा मृत्यू सात दिवसांच्या आत झाला आहे. इतकंच नाही तर डायबिटीस असलेल्या ५ मधील एका कोरोना रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. यातून डायबिटीस असेलेल्या रुग्णाला कोरोनाचं संक्रमण झालं तर किती घातक असू शकतं हे दिसून येत आहे.

हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते या कोरोनाच्या माहामारीत डायबिटिसच्या रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणं ही खूपच घातक असून याबाबत कोणतेही फॅक्ट्स सध्या समोर आलेले नाहीत. डायाबिटोलॉगिया या जर्नलमध्ये प्रकाशिक करण्यात आलेल्या अभ्यासानुसार डायबिटीसच्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त असतो. हे यूरोपियन एसोशिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबिटीजचे ऑफिशल जर्नल आहे

कोरोनाचे शिकार होऊन जीवन आणि मृत्यूशी झुंज देत असलेले सर्वाधिक लोक डायबिटीसने टाईप २ ने ग्रासलेले आहेत. खाण्यापिण्यातील असंतुलन आणि जीवनशैलीत होणारे बदल यांमुळे हा आजार होतो.

या संशोधनातून दिसून आलं की, मृत्यू होत असेल्यांमध्ये पुरूषांची संख्या जास्त आहे. तसंच रुग्णांचे वय ६५ ते ७० या दरम्यान होते. तज्ज्ञांच्यामते डायबिटीसच्या एक असा आजार आहे. ज्यामध्ये इंफ्लूएंजा इंफेक्शनची जोखिम जास्त असते.

कोविड19 सुद्धा श्वसनाशीसंबंधीत आजार असल्यामुळे व्हायरस शरीरात जलद गतीने आक्रमण करतो. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांसाठी कोरोनाचं संक्रमण जीवघेणं ठरू शकतं.

त्यासाठी डायबिटीसच्या रुग्णांनी आपली तपासणी आणि योग्य उपचार नियमित सुरू ठेवायला हवेत. कोरोनाशी संबंधित गाईडलाईन्सचं पालन करायला हवं.